घरक्रीडाक्रिकेटर पृथ्वी शॉने सेल्फी दिला नाही म्हणून फॅनला राग अनावर, बॅट घेऊन...

क्रिकेटर पृथ्वी शॉने सेल्फी दिला नाही म्हणून फॅनला राग अनावर, बॅट घेऊन गाडीचा पाठलाग केला अन्…

Subscribe

पृथ्वी शॉने दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यास नकार दिला. याचा त्याच्या फॅन्सना प्रचंड राग आला.

Indian Cricketer Prithvi Shaw: भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या फॅनमुळे तो चर्चेत आलाय. तो सध्या टीम इंडियातून बाहेर पडला असला तरी तो इतर गोष्टीसाठी चर्चेत येत असतो. क्रिकेटर पृथ्वी शॉवर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला आहे.

पृथ्वी शॉ काही दिवसांपासून त्याच्या मित्रासोबत फिरत असून तो मुंबईतल्या सहारा स्टार हॉटेल (5 स्टार हॉटेल) मध्ये आला होता.. यादरम्यान त्याचे काही फॅन्स त्याच्याजवळ आले आणि सेल्फी घेण्याचा आग्रह करू लागले. पृथ्वी शॉने सेल्फी दिल्यानंतरही त्याने आणखी एक सेल्फी मागायला सुरुवात केली. त्यावेळी पृथ्वी शॉने दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यास नकार दिला. याचा त्याच्या फॅन्सना प्रचंड राग आला. पृथ्वी शॉने सेल्फी घेण्यास नकार दिल्यानंतर हॉटेल मॅनेजरने दोन्ही फॅन्सना हाकलून दिले. यामुळे फॅन्सच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि काही वेळाने हॉटेलमधून निघालेल्या पृथ्वीच्या कारचा पाठलाग केला.

- Advertisement -

पृथ्वी शॉची कार जोगेश्वरी लिंक रोड लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ पोहोचली असताना त्या दोन्ही फॅन्सनी त्याची कार अडवली. यानंतर त्यांनी हातात बॅट घेऊन पृथ्वी शॉच्या कारच्या काचा फोडल्या. पण या कारमध्ये क्रिकेटपटू पृथ्वी शॉ नव्हता, त्याचा मित्र ही कार चालवत होता. हॉटेलमधून दुसऱ्या गाडीत बसून पृथ्वी घराकडे निघाला होता.

- Advertisement -

तसेच त्या फॅन्सनी पृथ्वी शॉच्या मित्राकडे काही पैशांची मागणीही केली होती, जी मित्राने स्वीकारली नाही. आता ओशिवरा पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम १४३, १४८,१४९, ३८४, ४३७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सना गिल आणि शोभित ठाकूर अशी या दोन्ही फॅन्सची नावं आहेत.

 

पृथ्वी शॉचा नुकताच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला होता, मात्र या मालिकेत तो एकही सामना खेळू शकला नाही. संघात राहूनही त्याला संधी मिळाली नाही. जुलै २०२१ मध्ये त्याने पहिला टी-20 सामना खेळला असला तरी त्यात तो खाते न उघडता बाद झाला. पृथ्वी शॉने टीम इंडियासाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केले असले तरी, तो बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे आणि त्याला खेळण्याची संधी मिळत नाही. दरम्यान, या घटनेत पृथ्वी शॉची विशेष भूमिका नसली तरी तो चर्चेत आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -