घरमुंबईतरुण महिलांमध्ये वंध्यत्वाचे वाढते प्रमाण, ISECचा निष्कर्ष

तरुण महिलांमध्ये वंध्यत्वाचे वाढते प्रमाण, ISECचा निष्कर्ष

Subscribe
वाढते प्रदूषण, धकाधकीचं जीवन आणि बदलती जीवनशैली याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. शिवाय याचा सर्वात जास्त परिणाम तरुण महिलांवर होतो, त्यातून तरुण महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढते आहे.
इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज म्हणजेच आयएसईसीने केलेल्या अभ्यासाच्या मते भारतातील अंदाजे १ ते २ टक्के महिलांमध्ये वयाच्या २९ ते ३४ व्या वर्षात रजोनिवृत्तीचं वाढतं प्रमाण दिसून आलं आहे. तसेच ३५ ते ३९ वर्ष वयाच्या महिलांमध्ये हे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचं आढळलं आहे. तसंच, ३0 दशलक्ष जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या आढळून आली आहे.
अंडाशय निकामी झाले की त्यामध्ये सर्वसाधारण प्रमाणातील इस्ट्रोजन हार्मोनची निर्मिती होत नाही आणि त्यामुळे नियमितपणे मासिक पाळी येण्यास महिलांना त्रास होतो. दररोज धूम्रपान, गर्भनिरोधक गोळ्यांचा योग्य सल्ल्याविना वापर, गर्भाशयाची शस्त्रक्रिया, अँटिकॅन्सर थेरेपी आणि कुटुंबातील पीओएफ असे अनेक प्रकार आणि कारणं लहान वयात अंडाशयामध्ये अंड्यांचा साठा कमी करण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. महिलांच्या अंडाशयामध्ये अंड्यांची संख्या कमी असली की स्त्रियांमधील पुनरुत्पादनाची क्षमता कमी होते आणि त्यांना गर्भधारणा होणे अवघड होते.
प्रिमॅच्युअर ओव्हरिअन फेल्युअर म्हणजेच पीओएफ याला प्रिमॅच्युअर ओव्हरिअन इनसफिशिअन्सी असेही म्हटले जाते. या स्थितीमध्ये गर्भाशयातील अंड्यांची संख्या वयाशी संबंधित कारणांनी कमी होत जाते आणि त्याचा परिणाम तरुण वयात ४० वर्षांपेक्षा कमी गर्भधारणा होण्यामध्ये अडथळे येण्यामध्ये होऊ शकतो. सहसा अंडाशयातील फॉलिकल्स वयाच्या ४० ते ४५ वर्षांपर्यंत महिलांसाठी अंडी पुरवतात. पीओएफ केसेसमध्येए ३० वर्षे इतक्या तरुण स्त्रियांमध्येही अंडाशयामध्ये फलन होत नसल्याचे दिसून येते, असं मुंबईतील फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. सुलभा अरोरा यांनी सांगितले. त्यामुळे जर महिलांना कमी वयात रजोनिवृत्तीची लक्षणे आणि कारणे आढळली तर डॉक्टरांचा त्वरीत सल्ला घ्यावा, असंही डॉ. अरोरा या सांगतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -