घरमुंबईआयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस

आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस

Subscribe

2 लाख 23 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

रोजगारक्षम अभ्यासक्रमाला केंद्र सरकारकडून प्राधान्य देण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून विविध कौशल्य अभ्यासक्रमावर भर देण्यात येत आहे. याला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत असून राज्यातील 1 लाख 37 हजार जागांसाठी तब्बल 3 लाख 59 हजार 708 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 2 लाख 23 हजार 114 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. त्यामुळे एका जागेसाठी दोन ते तीन विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागण्याची शक्यता आहे.

राज्यभरात 417 सरकारी तर 538 खासगी आयटीआय आहेत. सरकारी आयटीआयमध्ये 89 हजार 616 जागा तर खासगी आयटीआयमध्ये 47 हजार 684 जागा उपलब्ध आहेत. सरकारी व खासगी जागांमध्ये असलेल्या 1 लाख 37 हजार 300 जागा आहेत. आयटीआयमध्ये दरवर्षी इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मॅकेनिक डिझेल, मोटर मॅकेनिक या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते. आयटीआयच्या अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यताही अधिक असल्याने आयटीआय अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. रविवारी आयटीआयला नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असला तरी शनिवारपर्यंत आयटीआयमधील 1 लाख 37 हजार 300 जागांसाठी राज्यभरातून तब्बल 3 लाख 59 हजार 708 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 23 हजार 114 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. तर 1 लाख 88 हजार 776 विद्यार्थ्यांनी पर्यायही भरले आहेत.

- Advertisement -

आयटीआय प्रवेश अर्ज नोंदणी 3 जूनपासून सुरू झाली. या नोंदणीला दिवसेंदिवस मोठी पसंती मिळू लागली आहे. प्रवेश अर्ज करण्याची मुदत 30 जून रोजी संपुष्टात येणार आहे. तर 1 जुलैपर्यंत अर्ज निश्चित करता येणार असल्याने अर्जांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे उपलब्ध जागांपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने यावर्षी आयटीआयच्या एका जागेसाठी दोन ते तीन उमेदवारांमध्ये चुरस निर्माण होणार आहे. आयटीआयच्या एका जागेसाठी दोन ते तीन उमेदवारांमध्ये चुरस लागण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळी समोर येणार्‍या आकडेेवारीनुसार इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मॅकेनिक डिझेल, मोटर मॅकेनिक या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस असणार आहे.

महत्वाचे अभ्यासक्रम
एक वर्ष मुदतीचे : यांत्रिकी, नळ कारागीर, गवंडी, सुतारकाम, संधाता, पत्रेकारागीर, मॅकेनिक डिझेल, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, कर्तन, शिवणशास्त्र, भरतकाम, विणकाम, हेअर अँड स्कीन केअर, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, लघुलेखन इंग्रजी, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोसेसिंग

- Advertisement -

दोन वर्षे मुदतीचे : यांत्रिक कृषी, रंगारी, तारतंत्री, यांत्रिक मोटारगाडी आरेखक, यांत्रिकी आरेखक, स्थापत्य, वीजतंत्री, टी.व्ही. दुरुस्ती, यंत्रकारागीर घर्षक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मेंटेनन्स, वीज विलेपक, मेकॅनिकल, मशीन टूल्स मेटेंनन्स, टूल अँड डायमेकर अभ्यासक्रम आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -