घरमुंबईजे.जे. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी आचारसंहिता

जे.जे. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी आचारसंहिता

Subscribe

तोकडे कपड्यांवर बंदी, वेळेचे निर्बंध

जे.जे. मेडिकल कॉलेज परिसरात विद्यर्थिनींनी तोकडे कपडे घालून फिरु नये. तसेच कॉलेजच्या अस्तित्त्व युवा महोत्सवातही मुलींनी तोकडे कपडे परिधान करु नये, असा नियम जे.जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्या नावाने जे. जे. मेडिकल कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये फिरत आहे. याशिवाय रात्री 10 वाजताच्या आत विद्यार्थिनींनी हॉस्टेलमध्ये यावे, असेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. या नियमांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला आहे. कॉलेज प्रशासनाने अशी कारवाई केल्यास उत्तर देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. मुलींनी कोणते कपडे घालावेत किंवा घालू नयेत, याबाबत वाद यापूर्वी मुंबईतील महाविद्यालयांत पाहायला मिळाला होता.

जे.जे मेडिकल कॉलेजच्या वोर्डन शिल्पा पाटील यांच्या नावाने कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा मेसेज फिरत आहे. 18 मार्चपासून जेजेमध्ये कॉलेजचा ‘अस्तित्त्व’ हा महोत्सव सुरु होता. या महोत्सवाच्या पाश्वर्र्भूमीवर शुक्रवारी हॉस्टेलच्या वॉर्डनकडून डीन चंदनवाले यांच्या नावाने मेसेज फॉरवर्ड करण्यात आला. या मेसेजमध्ये फेस्टिवलमध्ये मुलींनी तोकडे कपडे घालू नयेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय अस्तित्व महोत्सवात तुम्ही जर तोकडे कपडे घातले तर आम्ही इव्हेंट कॅन्सल करु, अशी तंबी कॉलेजकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

इथवरच न थांबता मुलींनी रात्री 10 वाजण्यापूर्वी हॉस्टेलला परत यायला पाहिजे, मुले आणि मुलींनी वेगळे बसावे, मुले-मुलींनी कार्यक्रमात एकत्र डान्स करू नये, असे नियम लादण्यात आले आहेत. मुलींना असे नियम असताना मुलांना मात्र कितीही वाजता परत येण्याची मुभा देण्यात आली आहे. या अजब नियंमाना विद्यार्थ्यांनी मात्र कडाडून विरोध केला आहे.

विद्यार्थिनींची बाजू ऐकू
याप्रकरणी जे जे डीन अजय चंदनवाले यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता, त्यांनी योग्य कपडे परिधान करुन यावे, असा मेसेज मी दिला होता. शिवाय होळीला महाविद्यालय परिसरात गोंधळ झाल्यानंतर आम्ही काही कडक नियम केले आहेत. हे नियम या कार्यक्रमा पुरते होते. शिवाय, याबाबत विद्यार्थिनीचे म्हणणे ऐकले जाईल आणि या बाकी नियमांबाबत विचार केला जाईल असे चंदनवाले यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -