घरमुंबईपत्रकार नित्यानंद पांडे हत्याप्रकरणी सहकारी महिलेसह दोघांना अटक

पत्रकार नित्यानंद पांडे हत्याप्रकरणी सहकारी महिलेसह दोघांना अटक

Subscribe

‘इंडिया अनबाउंड’ या पाक्षिकाचे संपादक नित्यानंद पांडे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पांडे यांची सहकारी अंकिता मिश्रा आणि तिचा मित्र सतीशकुमार मिश्रा या दोघांना अटक केली आहे. नित्यानंद पांडे यांच्या सततच्या लैिंंंंगग छळाला कंटाळून अंकिताने मित्र सतीशकुमार याच्या मदतीने नित्यानंद पांडे यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र या हत्यामागे आणखी वेगळे कारणदेखील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नित्यानंद पांडे हे मीरा रोड पूर्व येथील एका उच्चभ्रू सोसायटीत पत्नी पूनम आणि दोन मुलांसह राहत होते. त्याच परिसरातून मागील काही वर्षांपासून ते ‘इंडिया अनबाउंड’ नावाचे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील पाक्षिक चालवत होते. या पाक्षिकाचे मालक संपादक नित्यानंद पांडे हे स्वतः या पाक्षिकाचे काम पाहत होते. त्यांनी मदतनीस म्हणून अंकिता मिश्रा (२४) या तरुणीला मागील दोन वर्षांपासून कामासाठी ठेवले होते. आयपीएस तसेच आयएस अधिकार्‍यांच्या सतत संपर्कात असणारे नित्यानंद पांडे १५ मार्च रोजी रात्रीपासून अचानक बेपत्ता झाले होत

- Advertisement -

त्यांचा फोनदेखील लागत नव्हता. त्यामुळे त्यांची पत्नी पूनमने नित्यानंद यांचा शोध घेण्यासाठी मित्र मंडळींना संपर्क साधला. मात्र, नित्यानंद यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्यामुळे अखेर पत्नी पूनमने दुसर्‍या दिवशी काशीमीरा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

नित्यानंद पांडे यांचा शोध सुरू असताना १६ मार्च रोजी भिवंडी तालुक्यातील खार्डी गावात असणार्‍या ओढ्यात भिवंडी तालुका पोलिसांना एका इसमाचा मृतदेह मिळाला. सदर मृतदेह काशिमिरा येथून बेपत्ता झालेले नित्यानंद पांडे यांचा असल्याचे चौकशीत उघडकीस आले. तालुका पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाखे यांच्या पथकाने मीरा रोड येथेच राहणारी नित्यानंद पांडे यांची मदतनीस अंकिता मिश्राला चौकशीसाठी ताब्यात घेऊन तिची उलटतपासणी केली. त्यावेळी तिने अधिक आढेवेढे न घेता गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -

मित्र सतीश कुमार मिश्रा याच्या मदतीनेच संपादक नित्यानंद पांडे यांची हत्या केल्याचे तिने कबूल केले. नित्यानंद पांडे हे गेल्या दोन वर्षांपासून माझा लैंगिग छळ करीत होते. त्यांना विरोध केला असता त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर सतीशकुमार मिश्रा हादेखील पांडे यांच्या वर्तणुकीला कंटाळला होता. अखेर दोघांनी मिळून पांडे यांना ठार करण्याचा बेत आखला होता.

अंकिताने १५ मार्च रोजी रात्री नित्यानंद पांडे यांच्या मोबाईल फोनवर करून त्यांना बोलावून घेतले. आपल्याला उत्तन येथे एक रो हाउस बघायला जायचे आहे, असे सांगून सतीशकुमारने आणलेल्या टोयाटो गाडीने तिघेही भिवंडीच्या दिशेने निघाले. वाटेत अंकिताने प्रोटीन पेयामधून गुंगीचे औषध टाकून पांडेंना पाजले. त्यानंतर पांडे यांची गळा आवळून हत्या करून मृतदेह भिवंडी तालुक्यातील खार्डी गावातील ओढ्यात फेकला, अशी कबुली अंकिताने पोलिसांना दिली. पोलिसांनी अंकिता आणि सतीश या दोघांना हत्येच्या गुन्ह्यात अटक करून पुढील तपासासाठी भिवनदी तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -