घरमुंबई‘आयमेकॉन’कडून तरुणांच्या भावविश्वाचा वेध

‘आयमेकॉन’कडून तरुणांच्या भावविश्वाचा वेध

Subscribe

शालेय शिक्षण संपवून कॉलेजमध्ये प्रवेश करणार्‍या पौंगडावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचा आयएमए कल्याणातर्फे आयोजित ‘आयमेकॉन’मध्ये वेध घेण्यात आला. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या दोन दिवसीय परिसंवादामध्ये बदलती औषध-उपचार पद्धती, वैद्यकीय क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान आदींवर तज्ज्ञांच्या उपस्थितीत उहापोह करण्यात आला. तर या परिसंवादातील ‘उडान’ कार्यक्रमातून पौंगडावस्थेतील मुलांच्या आणि पालकांच्या नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकण्यात आला.

कल्याण आयएमएतर्फे ‘आयमेकॉन’ या परिषदेचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे हे 28 वे वर्ष होते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये जगभरात होणारे बदल, बदलते आधुनिक तंत्रज्ञान, नविन उपचार पद्धती आदी ठळक मुद्द्यांवर या ‘आयमेकॉन’ परिसंवादात माहिती दिली जाते. 6 आणि 7 डिसेंबर असा दोन दिवस चाललेल्या या परिसंवादात राज्यभरातून तब्बल 1 हजार डॉक्टर सहभागी झाले होते. तर एक सामाजिक भान आणि जबाबदारी जपत डॉक्टरांनी या परिसंवादातील ‘उडान’ कार्यक्रमाद्वारे सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.

- Advertisement -

शालेय शिक्षण संपवून कॉलेजमध्ये प्रवेश करणारी मुले, आईबाबांना त्यांच्याकडून असणार्‍या भरमसाठ अपेक्षा, पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाणारी मुले, त्याचा मुलांच्या भावविश्वावर आणि पालक-मुलांमधील नातेसंबंधांवर होणारा नकारात्मक परिणाम, इंटरनेट-मोबाईल-लॅपटॉप-टिव्हीचा अतिरेकी वापर, मित्रांचा दबाव, व्यसने, प्रेम अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर ‘उडान’ कार्यक्रमातून प्रकाशझोत टाकण्यात आला. ऑर्गनायजिंग चेअरमन डॉ. स्मिता महाजन, डॉ. अंजुम सय्यद, डॉ. भूषण पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

तर ‘आयमेकॉन’ परिषद आणि ‘उडान’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कुमार सांगळे, सचिव डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह कल्याण आयएमएच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान यावेळी हैदराबादमधील डॉ. प्रियांका रेड्डीला कल्याण आयएमएतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच गुजरातमध्ये झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेमधील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील विजेता प्रसाद मुकुंद गायधनी या चिमुरड्यालाही कल्याण आयएमएतर्फे गौरवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -