घरमुंबईधोकादायक पत्री पूल २४ ऑगस्टला पाडण्यात येणार

धोकादायक पत्री पूल २४ ऑगस्टला पाडण्यात येणार

Subscribe

कल्याणचा १०४ वर्ष जुना पत्री पूल इतिहास जमा होणार आहे. उद्यापासून हा पूल वाहतूकिसाठी बंद करण्यात येणार आहे. तर २४ तारखेपासून हा पुल पाडण्यात येणार आहे. रेल्वेकडून हा पूल पाडण्यात येणार आहे.

कल्याणचा धोकादायक पत्री पूल उद्यापासून वाहतूकीसाठी बंद होणार आहे. २४ तारखेपासून हा पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलासंदर्भात कल्याणमध्ये बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

अखेर पुल पाडण्याचे दिले आदेश

कल्याणच्या पत्री पुलाचे जुलै महिन्यात स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले होते. त्यावेळी हा पूल धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. हा पुल लवकरात लवकर पाडण्यात यावा असे आदेश केडीएमसीला देण्यात आले होते. याचसंदर्भात आज केडीएमसीच्या मुख्यालयात रेल्वे, एमएसआरडीसी आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अखेर हा पुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

१०४ वर्षाचा पुल इतिहास जमा होणार

१०४ वर्षाचा हा जुना पुल इतिहास जमा होणार आहे. उद्यापासून या पुलावरील वाहतूक थांबवण्यात येणार आहे त्यानंतर दोन दिवसाने म्हणजे २४ ऑगस्टला हा पूल पाडायला सुरुवात होणार आहे. या बैठकी दरम्यान रेल्वेकडे पूल पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पुलाचा कल्याण आणि डोंबिवलीकर मोठ्याप्रमाणात वापर करत होते. आता उद्यापासून हा पुल बंद होणार असल्याने या भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -