घरमुंबईआरोग्य विभागाचे सॉफ्टवेअर धूळखात ...

आरोग्य विभागाचे सॉफ्टवेअर धूळखात …

Subscribe

रूग्णांची इत्यंभूत माहिती ठेवणारे हे सॉफटवेअर असणार आहे. मात्र ही सर्व यंत्रणा धुळखात पडली असल्याचे उजेडात आले आहे.

देशातील पहिली संगणकीकरण करणारी महापालिका म्हणून ओळख असणार्‍या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सर्वच विभागाचे संगणकीकरण केले जात असताना, आता आरोग्य विभागाचेही संगणकीकरण सुरू आहे. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून टॅबही खरेदी करण्यात आले आहेत. रूग्णांची इत्यंभूत माहिती ठेवणारे हे सॉफ्टवेअर असणार आहे. मात्र ही सर्व यंत्रणा धुळखात पडली असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे संगणकीकरण कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेचे कल्याणला रूक्मिणीबाई आणि डोंबिवलीला शास्त्रीनगर रूग्णालय आहेत. आरोग्य विभाग संगणकाने जोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार डॉक्टरांसाठी सॉफटवेअर तयार करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअर मध्ये रुग्णाचा केसपेपर तयार करणे, त्याच्या आजाराची नोंद, कोणत्या प्रकारची ट्रिटमेंट सुरू आहे, त्यासंबधीच्या गोळ्या व इंजेक्शन याची नोंद होणार आहे. तत्कालीन आयुक्त ई-रविंद्रन यांच्या कारकिर्दीत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अजूनही आरोग्य विभागात ते सॉफ्टवेअर वापरले जात नसल्याची नाराजी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी व्यक्त केली. सॉफ्टवेअरचा वापर करा करावा याचे प्रशिक्षण डॉक्टरांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही सर्व यंत्रसामुग्री धूळखात पडली आहे, असे अनेक डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तसेच ही प्रक्रिया किचकट असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर चा वापर होऊ शकलेला नाही. या सॉफ्टवेअरचा वापर तातडीने करण्यात यावा असेही निर्देश सभापती दामले यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

- Advertisement -

शवविच्छेदनासाठी डॉक्टरांवर सक्ती

कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात २१ डॉक्टर असून डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात १३ डॉक्टर आहेत. कल्याणातील रूक्मिणीबाई रूग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा आहे. मात्र शवविच्छेदनासाठी शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टरांना बोलावून घेतले जाते. रूग्णालयात डॉक्टरांची संख्या अपुरी असतानाही त्यांना कल्याणला बोलावून घेतले जात असल्याने अपुर्‍या डॉक्टरांच्या संख्येमुळे इतर डॉक्टरांना ताण सहन करावा लागत आहे. रूक्मिणीबाई रूग्णालयात अधिक डॉक्टर असतानाही त्यांना का बोलावण्यात येते असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. तसेच शास्त्रीनगर रुग्णालयात जागा नसल्याने शवविच्छेदनाची सुविधा अद्याप सुरू करता आलेली नाही अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -