घरमुंबईमुख्यमंत्री साहेब गाठ माझ्याशी आहे, हिशोब तर द्यावाच लागेल - किरीट सोमय्या

मुख्यमंत्री साहेब गाठ माझ्याशी आहे, हिशोब तर द्यावाच लागेल – किरीट सोमय्या

Subscribe

ज्याने कोणी चोरीचा पैसा घेतला आहे तो परत द्यावाच लागेल.

कोरलाई जमीन प्रकरणावरून भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. नाईक कुटुंबीयांना पुढे करून मुख्यमंत्री पैशांची अफरातफर करत आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं की तुमची गाठ माझ्याशी आहे तुम्हाला सगळे पैसे द्यावेच लागतील आणि चौकशीला सामोरे जावेच लागेल असं विधान किरीट सोमय्या यांनी केले आहे. मी नाईक कुटुंबीय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जमीन खरेदी चा घोटाळा बाहेर काढला त्यावेळी शिवसेनेचे १२ नेते माझ्या विरोधात एकवटले होते. आता हे सर्व नेते कुठे गेले असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे

दरम्यान अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने गुरुवारी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. किरीट सोमय्या यांचा जीव वर-खाली का होतोय ठाकरे कुटुंब आणि अनुभवी नाईक यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारात किरीट सोमय्या इतका रस का घेत आहेत, असा सवाल त्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली यावेळी त्यांनी नाईक कुटुंब यावर माझी हरकत नसल्याचे म्हटले आहे. परंतु कोरलाई जमीन घोटाळा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मार्च महिना आला मुख्यमंत्री उत्तर का देत नाही आहेत? १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१९ पर्यटन अन्वय नाईक यांच्या नावाने प्रॉपर्टी टॅक्स भरला, याचं उत्तर का देत नाही आहेत? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -

नाईक कुटुंबीय जमिनीची खरेदी-विक्री हा आमचा व्यवसाय असल्याचा दावा करत आहेत. ही गोष्ट चांगली आहे. पण ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे, याविषयी कोणीही बोलत नाही. नाईक परिवाराला पुढे करून ते पैशांची अफरातफर करत असतील तर मला बोलावेच लागेल. ज्याने कोणी चोरीचा पैसा घेतला आहे तो परत द्यावाच लागेल. जसा संजय राऊत यांना द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांची गाठ किरीट सोमय्याशी आहे. त्यांना सगळे हिशेब द्यावेच लागतील, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.


हेही वाचा : यंदाचा अर्थसंकल्प फसवा; पुणे केंद्रीत अर्थसंकल्प – नारायण राणे

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -