घरमुंबईयंदाचा अर्थसंकल्प फसवा; पुणे केंद्रीत अर्थसंकल्प - नारायण राणे

यंदाचा अर्थसंकल्प फसवा; पुणे केंद्रीत अर्थसंकल्प – नारायण राणे

Subscribe

...मग बजेटला काय अर्थ?

राज्याचा अर्थसंकल्प जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे. हा अर्थसंकल्प पुणे केंद्रित अर्थसंकल्प असून हा बोगस अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला तो अर्थसंकल्प हा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे. भांडवली खर्च झिरो आहे. आज तिजोरीत खडखडाट आहे. सागरी महामार्ग करणार पण तरतुद नाही, पण पुण्याला महामार्गाला तरतूद करण्यात आलेल्या आहेत. अर्थसंकल्पात पुण्याला सर्व काही देण्यात आलं आहे. कारण पुण्यातील व्यक्तीची जास्त चालते, असं नारायण राणे मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हणाले.

मग बजेटला काय अर्थ?

अर्थसंकल्पात ६६ हजार कोटी तूट आहे. ही तूट कशी भरून काढणार याबाबत काही खुलासा नाही. ही तूट कशी भरणार हे त्यांच्या भाषणात नाही. त्यांनी पुस्तक देखील छापलं नाही. ग्रीन बुक नाही, व्हाइट बुक नाही मग बजेटला काय अर्थ? जनतेच्या डोळ्यात धूळ फेक कारण अर्थसंकल्प आहे. आकड्यांची हेराफेरी आहे. यावर्षी कोरोना संपला नाही उद्योग धंदे कुठे आहेत? मग उत्पन्न कुठून येणार? अर्थमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी वाचून दाखवली आहे. कुठून येणार पैसे ते सांगितले का? असा सवाल राणेंनी केला. काही मंत्र्यांच्या आशीर्वादाने डान्स बार आणि पब चालू आहेत, असा टोला आदित्य ठाकरेंचं नाव न घेता लगावला. अर्थसंकल्पात सगळं बोगस आहे कसे येणार उत्पन्न सांगा तरी, असा सवाल राणेंनी केला.

- Advertisement -

अर्थसंकल्पात वायदे सरकारने दिला आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वायद्याला विचारत कोण? शेतकऱ्यांना काय दिलं? प्रत्यक्षात महावितरणाला एकही रुपये मिळणार नाही मग महाराष्ट्राला सुरळीत महावीतरण होईल का? अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला दुसऱ्या साहेबांना कळला का सांगावं त्यांनी नुसती मान हलवत होते, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.


Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -