घरमुंबईकल्याण लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावून गद्दारीचा कचरा साफ करूया; Sanjay Raut यांचे...

कल्याण लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावून गद्दारीचा कचरा साफ करूया; Sanjay Raut यांचे टीकास्त्र

Subscribe

डोंबिवली : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आल्यानंतर आज पहिल्यांदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदार संघाचा दौरा करत आहेत. यावेळी ते अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवलीसह कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी साधणार संवाद आहे. अशातच डोंबिवली मतदार संघात शिवसैनिकांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. (Lets clear the trash of traitors by hoisting Shiv Sena saffron on the Kalyan Lok Sabha Sanjay Raut)

हेही वाचा – Uddhav Thackeray सहकाऱ्यांना घरगडी समजतात, त्यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी; Eknath Shinde यांचे प्रत्युत्तर

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, आमच्या घराणेशाहीविषयी बोलायचे असेल तर ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि एका हिंदुत्वांच्या विचाराची घराणेशाही शिवसेना पुढे घेऊन चाललेली आहे. ही गुलामीची, गद्दारीची घराणेशाही याठिकाणी चालणार नाही आहे. या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये चालणार नाही आहे, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे आज कुठेतरी कचरा काढत आहेत. काय करत आहेत तर कचरा काढत आहेत. आज ठाण्यामध्ये, उद्या डोंबिवली आणि परवा कल्याणला त्यांच्याच कचरा आपण साफ केलेला आहे आणि साफ करूया, असे आव्हान त्यांनी शिवसैनिकांना केले.

गद्दारीचा कचरा साफ करूया – संजय राऊत

उपस्थित शिवसैनिकांकडे बघत संजय राऊत म्हणाले की, ही खरी शिवसेना आहे. या शिवसेनेचा निकाल राहुल नार्वेकर देऊ शकत नाही. ही शिवसेना राहुल नार्वेकर यांची नाही, जी ते कागदावर फिरवत आहेत. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये नाही. कल्याण लोकसभेवर शिवसेनेचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे आणि गद्दारीचा कचरा साफ करायचा आहे. त्यासाठी आजपासून त्या लढाईला सुरूवात झालेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करून आम्हाला मतं मागण्याची गरज नाही; Sharad Pawar स्पष्टच बोलले

गद्दारांना कायमचं गाढण्याचं काम डोंबिवलीमध्ये करूया

आज कल्याण-डोंबिवली मतदार संघात लोकांचा प्रतिसाद पाहता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत राहणार आहे. आज आपण निर्धार, निश्चय आणि निर्भयता दाखवलेली आहे, ती शेवटपर्यंत दाखवा, असे आव्हान त्यांनी शिवसैनिकांना केले. तसेच संपूर्ण महाराष्ट्राची शिवेसना या कल्याण-डोंबिवलीकरांच्या मागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण एक आदर्श निर्माण केला पाहिजे, या गद्दारांना कायमचं गाढण्याचं काम या डोंबिवलीमध्ये झालं आहे, हे दाखवून देऊया, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -