घरCORONA UPDATEकोरोनावर मात करून लढाई नक्की जिंकू - अनिल देशमुख

कोरोनावर मात करून लढाई नक्की जिंकू – अनिल देशमुख

Subscribe

गुरुवारी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत पडघा आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

कोरोनाच्या लढाईत प्रत्यक्षपणे कार्यरत असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्कर यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेसशिल्डचे वितरण करण्यात आले. गुरुवारी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत पडघा आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देशमुख यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर करत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर विविध विभागाचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. जनताही उत्तम सहकार्य करत आहे. त्यामुळे आपण कोरोनावर मात करून ही लढाई नक्की जिंकू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शासन करत असलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही गृहमंत्री देशमुख यांनी केले केले. राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या नेटवर्कच्या माध्यमातून अशाप्रकारे मदत राज्यभर पोहोचवण्यात आली आहे. याच उपक्रमाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरातील ‘आशा वर्कर’ ना या फेसशिल्डचे वितरण आजपासून सुरूवात करण्यात येत आहे. ‘आशा वर्कर’ या देखील रूग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असल्याने त्यांना स्वसंरक्षणासाठी या सुरक्षाकवचाचा फायदाच होईल, असेही देशमुख म्हणाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, आमदार शांताराम मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. शिवाजी राठोड, ठाणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर, कृषी, पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, भिवंडी प्रांत मोहन नलदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, भिवंडी गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, उपाध्यक्ष डॉक्टरसेल शिवदास भोसले, दशरथ तिवरे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. जिल्ह्यात सध्या अकराशे सहा आशा वर्कर कार्यरत आहेत. त्यांचा लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून फेसशिल्डमुळे कोरोनाबाधित किंवा संशयित रूग्णाकडून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने राज्यातील लोककलावंतांच्या खात्यात प्रत्येकी ३००० रू. ची मदत जमा केली आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या लोककलावंतांना ही दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -