घरदेश-विदेशLive Update : दिलीप लांडे २०२४ला बहुमतानं निवडून येणार - मुख्यमंत्री...

Live Update : दिलीप लांडे २०२४ला बहुमतानं निवडून येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

6/6/2023 19:44:12 दिलीप लांडे २०२४ला बहुमतानं निवडून येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


6/6/2023 19:1:47 गनिमी कावा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला – एकनाथ शिंदे

- Advertisement -

– शिवरायांच्या विचाराने आपले सरकार काम करत आहे

– रायगड ते राजभवन असा शिवराज्याभिषेक कार्यक्रम करत आहे

- Advertisement -

– सहा दिवसात टपाल तयार केले

– हे टपाल तिकीट महाराजांच्या कर्तुत्वाला वंदन करणारे

– शेतकरी केंद्रबिंदू म्हणून आपण काम करतोय

– राज्यातील प्रकल्प राज्याच्या हिताचे

– देशातील प्रकल्पांपैकी सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू


6/6/2023 18:0:20 रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाचे नवीन कुलगुरू


6/6/2023 16:19:4 जालन्यातील सामनगावात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू


6/6/2023 13:16:38 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भाजपाकडे जागावाटपासंदर्भात मागण्या

लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या पंधरा जागांची मागणी

मंत्रीमंडळ विस्तारात एक मंत्रीपद आपल्याला मिळावे

लोकसभेला शिर्डीतून उमेदवारी मिळावी अशी आठवलेंची मागणी


6/6/2023 13:14:51 पर्यटन वाढीसाठी लागणार निधी राज्य सरकार देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडीतून मोठी घोषणा

अंबोलीत हिल स्टेशन उभारण्याचा सरकारचा प्रयत्न


6/6/2023 13:10:45 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अमरावतीतील मोर्शीत आंदोलन

जमिनीचा मोबदला, नोकरीसाठी लागणारे दाखले न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजी

आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त


6/6/2023 9:45:24 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी सावंतवाडीमध्ये उपस्थित


6/6/2023 8:6:27 पुण्याच्या लालमहालात शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

कसबा गणपती ते लाल महाल पालखी मिरवणूक काढली जाणार

थोड्याच वेळात शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणार सुरुवात


6/6/2023 8:4:57 कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात साजरा होणार शिवराज्यभिषेक सोहळा

पहिल्यांदाच साजरा होणार शिवराज्यभिषेक सोहळा


6/6/2023 7:37:49 संभाजीराजे किल्ले रायगडावर दाखल

सोहळा संपेपर्यंत संभाजीराजे राजगडावर थांबणार

मावळ्यांना शिस्त पाळण्याचं संभाजीराजेंकडून आवाहन


6/6/2023 7:27:33 किल्ले रायगडावर आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

संभाजीराजे रायगडावर उपस्थित असणार आहेत

या सोहळ्यासाठी अडीच लाख मावळे रायगडावर जमले आहेत

 


6/6/2023 7:27:33 ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआयकडून चौकशी सुरू

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 101 मृतदेहांची अजूनही ओळख पटलेली नाही

288 प्रवाशांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असून 1100 प्रवासी जखमी झाले आहेत


6/6/2023 7:27:33 मुंबईसह उपनगरात रिमझिम पाऊस

सोमवारी रात्री उशिरा मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली

मुंबई उपनगरातील कुर्ला, बोरिवली, अंधेरीसह अनेक भागात रिमझिम पाऊस झाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -