घरमुंबईCorona: नवी मुंबईत आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन

Corona: नवी मुंबईत आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३१ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत ११ कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊनचे आदेश

देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरूच आहेत. दिवसेंदिवस वाढणारा बाधितांचा आकडा हा चिंताजनक असून कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. मुंबईतही गेल्या २४ तासांत २ हजार ३५२ नवे रुग्ण आढळले असून ४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ७ हजार ४९४ वर पोहोचला आहे. दरम्यान नवी मुंबईत आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. ११ ठिकाणी हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

हा भाग असणार कंटेनमेंट झोन

बेलापूर – त्रिमूर्ती सदन दारावे गाव, विशाल प्राईड सेक्टर ५०
नेरुळ – दिपसागर सोसायटी सेक्टर १९, २०, शिवशक्ती अपार्टमेंट सेक्टर ७ ते १०
वाशी – लाईन शिवथर टॉवर सेक्टर ३१, सेक्टर २८
तुर्भे – महावीर अमृत सोसायटी सेक्टर १९, निवारा सोसायटी सेक्टर ३
ऐरोली – ओमकार सोसायटी सेक्टर १०,
दिघा – दत्तकृपा अपार्टमेंट

- Advertisement -

अनलॉकमध्ये शिथील नियमही पुन्हा कठोर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३१ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत ११ कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर केलेल्या नागरिकांसाठी नियमही कठोर करण्यात आले आहेत. यामुळे अनलॉकमध्ये शिथील करण्यात आलेले नियमही आता पुन्हा कठोर करण्यात आले आहेत.

३१ ऑक्टोबरपर्यंत हे राहणार बंद

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कंटेनमेंट झोनची यादी आणि निर्बंध जाहीर केले आहेत. यानुसार सर्व अत्यावश्यक वस्तूची दुकाने यापूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहणार आहे. तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार असून सिनेमागृह, तरणतलाव, मनोरंजन उद्याने, थिएटर्स, ऑडिटोरिअम इत्यादी स्थळे बंद राहणार आहे. तर मेट्रो सेवादेखील बंद असणार आहे.


Covid-19 in US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -