घरदेश-विदेशSeema Haider : सीमा हैदरला पती सचिनकडून मारहाण? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Seema Haider : सीमा हैदरला पती सचिनकडून मारहाण? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Subscribe

सध्या सोशल मीडियावर सीमा हैदरचा एक व्हिडीओ शेअर होत असून यामध्ये तिला बेदम झाली असून तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून येत आहे. पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचे एक वेगळेच सत्य समोर आले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आजवर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सीमा सोशल मीडियावर अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. पण प्रेमासाठी भारतात आलेली सीमा पाकिस्तानची खबरी असल्याचीही चर्चा झाली होती. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे सीमा हैदर चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर सीमाचा एक व्हिडीओ शेअर होत असून यामध्ये तिला बेदम झाली असून तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून येत आहे. पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचे एक वेगळेच सत्य समोर आले आहे. (Seema Haider Viral video of assult and injury)

सीमा हैदर आणि तिचा पती सचिन हैदर या दोघांमध्ये वाद झाल्यामुळे तिला सचिनने मारहाण केल्याची माहिती या व्हिडीओनंतर समोर आली. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. ज्यामुळे सीमाला नेमकी मारहाण का करण्यात आली? तिला सचिननेच मारले आहे का? या दोघांमध्ये खरंच वाद होत आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही करण्यात येत असून याबाबतचे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओबाबत सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी खरी माहिती देत सांगितले की, हा व्हिडीओ बनावट आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर करून बनवण्यात आल्याचा दावा वकील एपी सिंह यांनी केला आहे. तर सर्वात पहिल्यांदा पाकिस्तानातील एका युट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता. पण हा व्हिडीओ बनावट असल्याचा दावा सीमा हैदरच्या वकिलांनी केला आहे.

- Advertisement -

सीमा हैदर भारतात आल्यापासून तिच्याबाबत अनेक नवनव्या गोष्टी समोर आल्या आहेत. चार मुलांची आई असलेली सीमा सचिनच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर ती नेपाळमार्गे भारतात पळून आली. तेव्हापासून तिच्याबाबतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. पण या सर्व पोस्टमध्ये कोणतेही सत्य नाही, असे कालांतराने समोर आले.

हेही वाचा… Nair fire : भाजपा आणि मिंधे गॅंगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात? आदित्य ठाकरेंचा सवाल

पबजी (PUBG) गेम खेळत असताना सीमा हैदरची ओळख ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या 22 वर्षीय सचिन मीणा याच्याशी झाली. दोघे 2020पासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. नवी दिल्लीपासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या राबूपुरा गावात सीमा ही सचिन आणि त्याच्या कुटुंबासोबत राहते. भारतात आल्यानंतर सीमाने हिंदू धर्म स्वीकारला. पण तिने पुन्हा पाकिस्तानात निघून जावे, असे तिला सांगण्यात आले होते. परंतु, सचिनला सोडून पाकिस्तानात जाण्यापेक्षा भारतात मरण पत्करेन, असेही तिच्याकडून सांगण्यात आले होते.


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -