घरमुंबईLoksabha Election : दक्षिण मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाची रणनिती; 'हा' नेता लढवणार...

Loksabha Election : दक्षिण मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाची रणनिती; ‘हा’ नेता लढवणार निवडणूक

Subscribe

Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांनी होणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटानेही आतापासूनच तयारी सुरु केली असून यासंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी आज (30 सप्टेंबर) मातोश्रीवर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दक्षिण मुंबईत मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला असून नेत्याचे नावही ठरविण्यात आल्याचे समजतेल. (Loksabha Election Thackeray groups strategy to win South Mumbai This leader will contest the election)

हेही वाचा – जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको!; आदित्य ठाकरेंनी सरकारला सुनावले

- Advertisement -

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या बैठकीत दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या आढावा घेण्यात आल्याचे समजते. 2019 मध्ये दक्षिण मुंबईची जागा आपण जिंकून आलो होतो. अरविंद सावंत यांनी ही जागा राखली होती. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीला देखील ही जागा आपल्याकडेच राहावी यासाठी अरविंद सावंत हे उमेदवार असतील, त्यामुळे कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

अमोल किर्तीकर यांना उमेदवार करण्याची ठाकरे गटाची तयारी

ठाकरे गटाने गणेशोत्सवापूर्वी मुंबई वगळता राज्यातील इतर लोकसभा मतदारसंघाचा घेतला होता आढावा. आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे. खासदार गजनान किर्तीकर हे शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्या जागी त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना मैदानात उतरवण्याची ठाकरे गटाने तयारी सुरु केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर ठाणेकरांचा टोल प्रश्न त्वरित मार्गी लागेल; आनंद परांजपेंनी राज ठाकरेंकडे केली मागणी

विधानपरिषद, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतची सूचना

उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत विधानपरिषद, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीही तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांना मतदारसंघात जाऊन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फुट पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -