घरठाणे...तर ठाणेकरांचा टोल प्रश्न त्वरित मार्गी लागेल; आनंद परांजपेंनी राज ठाकरेंकडे केली...

…तर ठाणेकरांचा टोल प्रश्न त्वरित मार्गी लागेल; आनंद परांजपेंनी राज ठाकरेंकडे केली मागणी

Subscribe

ठाणे : ठाणे आणि मुंबई शहरांच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावरील प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी आज आनंदनगर प्रवेशद्वारासमोर साखळी आंदोलन करत प्रस्तावित टोल दरवाढ रद्द करावी अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना एक विनंती केली आहे. (then the toll issue of Thanekar will be resolved immediately Anand Paranjape made a demand to Raj Thackeray)

हेही वाचा – ‘वाघनखं भाडेतत्वावर आणणार की कायमसाठी’, आदित्य ठाकरेंचा सरकारला बोचरा सवाल

- Advertisement -

आनंद परांजपे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावर सर्वपक्षीय नेते त्यांना भेटत असतात. राज ठाकरे यांचे या सर्वच नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. टोलप्रश्नी मार्ग काढायचा असेल, ठाणेकरांचा हा प्रश्न सोडवायचा असेल तर, राज ठाकरे यांनी शिष्टमंडळासह सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन मार्ग काढावा, असे मत व्यक्त केले. अशाप्रकारे मनसैनिकांना उन्हातान्हात उभे करून टोल प्रश्न सुटणार नाही. मनसैनिकांनी उन्हातान्हात उभे करून नाटकीय आंदोलन करण्याची मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सवय आहे, असे बोलून आनंद परांजपे यांनी एकप्रकारे टीका केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election : लोकसभेसाठी भाजपची नवी खेळी, मोठ्या नेत्यांना देणार उमेदवारी?

- Advertisement -

मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे टोलप्रश्नी आंदोलन सुरू आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण अविनाश जाधव यांना एवढीच विनंती आहे की, मनसैनिकांना उन्हातान्हात उभे करण्यापेक्षा जर राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले असते आणि टोल प्रश्नावर मार्ग काढला असता तर ते अधिक चांगले झाले असते. भर उन्हातान्हात मनसैनिकांना उभे करुन हा प्रश्न सुटणार नाही. असेही आनंद परांजपे यांनी म्हटले आहे. याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी सरचिटणीस रवींद्र पालव, विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, ब्लाॅक अध्यक्ष निलेश फडतरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -