घरमुंबईL&T कंपनी करणार मेट्रो-३च्या रुळांची बांधणी

L&T कंपनी करणार मेट्रो-३च्या रुळांची बांधणी

Subscribe

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या रेल्वे रूळ बांधणीसाठी अत्याधुनिक ट्रॅक यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) अंतर्गत बीकेसी ते कफ परेड स्थानकांदरम्यान मेट्रो रुळांच्या बांधणी करण्याचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो कंपनीला दिले आहे. अपलाईन तसेच डाऊनलाईन मिळून ४७ किमी रूळ बांधण्यात येणार आहे. या कंत्राट अंतर्गत रूळ उभारणी संदर्भातील सर्व कामे जसे की उत्तम दर्जाच्या रुळांची खरेदी आरेखन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग इत्यादी कामांचा समावेश राहील.

हेही वाचा – रेल्वेला वृक्षतोडीसाठी पालिकेची सशर्त परवानगी

अत्याधुनिक ट्रॅक यंत्रणेचा वापर

या कामाअंतर्गत हाय अँट्युनेशन ट्विन ब्लॉक स्लीपर या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. भारतात प्रथमच मुंबई मेट्रो ३ प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा वापरण्यात आला आहे हे विशेष. याप्रसंगी मुं.मे.रे.कॉ.चे प्रकल्प संचालक व प्रभारी व्यवस्थापकीय संचालक सुबोध गुप्ता म्हणाले की,”या प्रकल्पासाठी ट्रॅक एक महत्वाचा घटक आहे. मेट्रो-३ मार्गिकेवरील ऐतिहासिक वारसा इमारती असल्या कारणाने अत्याधुनिक ट्रॅक यंत्रणा आम्ही या प्रकल्पासाठी वापरणार आहोत. ज्यामुळे कंपने व ध्वनीचा प्रभाव जाणवणार नाही. याशिवाय प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -