घरमुंबईमुंबईकरांच्या तणावमुक्तीसाठी संडे स्ट्रीट मोहीम; पोलीस आयुक्तांच्या मोहिमेला गृहमंत्री, अक्षयकुमारची भेट

मुंबईकरांच्या तणावमुक्तीसाठी संडे स्ट्रीट मोहीम; पोलीस आयुक्तांच्या मोहिमेला गृहमंत्री, अक्षयकुमारची भेट

Subscribe

अभिनेता अक्षय कुमारसोबत नागरिकांनीही धाव घेतली. यावेळी अनेक चाहते अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते

मुंबईकरांना एक दिवस तरी तणावमुक्त वातावरणात वावरता यावं यासाठी मुंबई पोलिसांनी संडे स्ट्रीट मोहीम सुरु केली आहे. या मेहिमेअंतर्गत मुंबईकरांना रस्त्यावर मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यासारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या मदतीने संडेस्ट्रीट ही मोहीम दर रविवारी राबवली जाते. आज मरीन ड्राईव्ह परिसरात संडे स्ट्रीट मोहीम पार पडली, या मोहिमेला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार तसेच पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हजेरी लावली होती.

मुंबईत आज 13 ठिकाणी संडेस्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, मुंबई पोलिसांच्या या योजनेचा मुख्य उद्देश मुंबईकरांना घराबाहेर पडत विविध खेळ, योगा अशा विविध फिजिकल अॅटिव्हिटीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. त्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणचे रस्ते काही तासांकरिता बंद ठेवण्यात येतात. दर रविवारी सकाळी नागरिक मरीन ड्राईव्हवरील रस्त्यांवरही नागरिक योगा, झुंबा, व्यायाम आणि विविध खेळांचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण रस्ता व्यापतात. दरम्यान या रविवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात अभिनेता अक्षय कुमार मरीन ड्राईव्हर पोहचला, अक्षय कुमारच्या एन्ट्रीने उपस्थित नागरिकांना विशेष आश्चर्य वाटले. अभिनेत्याने नागरिकांना खेळ, व्यायामासाठी प्रोत्साहन देत पोलिसांसह उपस्थित नागरिकांनासोबत धावण्याचा आनंद घेतला.

- Advertisement -

अक्षय कुमारने मोहिमेला उपस्थिती दर्शवत म्हटले की, या ठिकाणी आज येऊन मला आनंद झालाय. कोरोना काळात सर्वत्र शांतता होती. मात्र यानंतरचे चित्र दिलासाजनक आहे. ही संडेस्ट्रीट कल्पना कायम राहावी केवळ रविवारीचं नाही तर दररोज व्यायाम करावा. सर्व लोकांसोबत चांगले संबंध जोडण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. आपल्या पोलीस दलातही अनेक कलाकार आहेत.

अभिनेता अक्षय कुमारसोबत नागरिकांनीही धाव घेतली. यावेळी अनेक चाहते अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. सुपरस्टारने यावेळी एका इलेक्ट्रिक बाईकची चाचणी देखील केली जी मुंबई पोलिस मरीन ड्राइव्ह स्ट्रेचवर गस्त घालण्यासाठी वापरली जाते.

- Advertisement -

धकाधकीच्या व्यस्त जीवनातून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळावा, तसेच तणाव दूर व्हावा यासाठी मुंबई पोलिसांनी संडे स्ट्रीट मोहीम राबवली जाते. यासाठी मुंबईच्या रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलिंग तसेच विविध सांस्कृतिक खेळ आदी कार्यक्रमांसाठी प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. यावेळी नागरिकांना रस्ते उपलब्ध करुन देण्यात येतात. आज मरीन ड्राइव्ह या ठिकाणी दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार आणि पोलीस सह आयुक्त ( का.व.सु ) विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिकांसह संडेस्ट्रीटमध्ये सहभाग घेतला.


Flood in Tripura: त्रिपुरामध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, 10 हजारांहून अधिक लोक बेघर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -