घरBudget 2024Maharashtra Budget Session : मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा, आशिष शेलारांची मागणी

Maharashtra Budget Session : मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा, आशिष शेलारांची मागणी

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या वतीने 293 अंतर्गत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या गतिशील विकासाची विधानसभेत माहिती दिली. याचवेळी त्यांनी मुंबईतील पाणी वाटपासंदर्भातील आणि मविआच्या काळातील मेट्रोच्या कामाच्या संदर्भातील श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हे प्रश्न उपस्थित करत असताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. (Maharashtra Budget Session: Bring out the white paper on water distribution in Mumbai, Ashish Shelar’s demand)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : अटल सेतूवरून विधानसभेत देशमुख-शेलारांमध्ये श्रेयवादाची लढाई

- Advertisement -

विधानसभेत 293 च्या प्रस्तावावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेमध्ये एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे असून त्यांनी मुंबईकरांकडून 30 हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही, झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्त्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मुंबई महापालिकेच्या 24 तास पाणीपुरवठा योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला असून या योजनेतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.

मुंबई शहरात आणि उपनगरात असमान पाणीपुरवठा होत आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रचंड तुटवडा मुंबईला जाणवत आहे, या पाणीपुरवठ्याचे मुंबई महापालिकेने गेल्या 25 वर्षात 30 हजार कोटी रुपये मुंबईकरांकडून करापोटी वसूल केले. एकाच परिवाराची सत्ता या महापालिकेत आहे, त्यांचाच महापौर, त्यांचीच स्थायी समिती, त्यांनीच निर्णय घेतले तरीही मुंबईकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे येत्या एक महिन्यात या सगळ्याचा हिशोब देणारी श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणी आमदाराची शेलार यांनी केली.

- Advertisement -

तर, महापालिकेतर्फे मुलुंड आणि वांद्रे पश्चिम म्हणजे एच पश्चिम या दोन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर
24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी 400 कोटी रुपये केवळ कन्सल्टंटला देण्यात आले. ही देखील योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून यासाठी ठाकरे गट जबाबदार असून या प्रकरणांमध्ये कोणता गैरव्यवहार झाला? याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणीही आमदार आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -