घरमुंबईराज्य सीमेवरील सैनिकांच्या पाठिशी - राधाकृष्ण विखे पाटील

राज्य सीमेवरील सैनिकांच्या पाठिशी – राधाकृष्ण विखे पाटील

Subscribe

देशाच्या सीमेवर दुर्गम भागात देशासाठी लढणार्‍या सैनिकांच्या पाठिशी आपण ठामपणे उभे आहोत असे विखे -पाटील यांनी सांगितले.

पुलवामा हल्ल्यानंतर सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवस आधीच संस्थगित करण्याच्या प्रस्ताव सरकारच्यावतीने आज विधानसभेत ठेवण्यात आला. या प्रस्तावाला विरोधकांनी पाठिंबा दिला. देशाच्या सीमेवर दुर्गम भागात देशासाठी लढणार्‍या सैनिकांच्या पाठिशी आपण ठामपणे उभे आहोत, हा संदेश देण्यासाठी आम्ही सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबा देत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

पायलटच्या सुटकेसाठी पावले उचलली पाहिजे

विखे पाटील म्हणाले की, मागील चार दिवस सीमेवर तणाव आहे. पाकिस्तान भारताचा सतत द्वेष करत आला आहे. त्यामुळे पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. भारतीय पायलटला पाकिस्तानच्या तावडीतून सोडवण्यासाठी पावले उचलली गेली पाहीजेत. त्यासाठी विधानसभेने ठराव संमत करावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

- Advertisement -

६ हजार पोलीस कशाला लागतात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई पोलिसांना जी काही कारवाई करायची आहे, ती करु दिली गेली पाहीजे. मात्र अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी ६ हजार पोलीस कशाला लागतात? याचाही कधीतरी सरकारने विचार केला पाहीजे. आज ही विषय चर्चेचा नाही मात्र मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे, त्यांनी याचा विचार करावा. तसेच भारतीय वायूसेनेचे वैमानिक वर्धमान अभिनंदन यांना पाकिस्तानने मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून लोकांच्या भावना तीव्र बनलेल्या आहेत. युद्ध कैदी असला तरी त्याला सन्मानाने भारतात पाठवले पाहीजे. या भावनेतून विधानसभेने ठराव करावा आणि राज्यपालांच्या माध्यामातून सरकारकडे पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -