घरमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या ४ उमेदवारांचे अर्ज दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या ४ उमेदवारांचे अर्ज दाखल

Subscribe

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसचे उमेदवार राजेश राठोड यांनी दीड वाजता आपला अर्ज भरला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.


पहा फोटो – उद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी केवळ नऊच अर्ज दाखल झाल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भाजपने आपल्या चार उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या डॉ.नीलम गो-हे, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे, प्रवीण दटके आणि काँग्रेसतर्फे राजेश राठोड यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे देखील सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब, मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे देखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -