घरमुंबईदहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; २२.८६% विद्यार्थी उत्तीर्ण

दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; २२.८६% विद्यार्थी उत्तीर्ण

Subscribe

दहावीच्या फेरपरीक्षेत एकूण २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परिक्षेकरिता बसले होते. त्यापैकी ५० हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाने हा निकाल ऑनलाईन जाहीर केला आहे. या राज्य मंडळाचा दहावीच्या फेरपरीक्षेत एकूण २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परिक्षेकरिता बसले होते. त्यापैकी ५० हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावरून या फेरपरिक्षेचा निकाल २२.८६% लागला आहे.

- Advertisement -

ही फेरपरिक्षा १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या दरम्यान घेण्यात आली होती. हा निकाल विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. मुंबईमध्ये एकूण ५३ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. यापैकी ७ हजार ८१२ विद्यार्थी या फेरपरिक्षेस बसले होते.

मंडळनिहाय निकाल

पुणे – १८.१२, नागपूर – ३०.८९, औरंगाबाद – २८.२५, मुंबई – १४.४८, कोल्हापूर – १५.१७, अमरावती – २९.५३, नाशिक – २५.०८, लातूर – ३१.४९ आणि कोकण – १५.८१ असा मंडळनिहाय निकाल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -