घरमुंबईवाहतूक सिग्नलच्या देखभालीच्या कंत्राटात कंपन्यांचे संगनमत

वाहतूक सिग्नलच्या देखभालीच्या कंत्राटात कंपन्यांचे संगनमत

Subscribe

मुंबईत एकूण सिग्नल जंक्शनची संख्या : ६४२, वाहतूक नियंत्रण कक्षाशी जोडलेली सिग्नल : २५८

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसह अनेक रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रक अर्थात सिग्नलच्या देखभालीच्या कंत्राटात चक्क संगनमत करत कंपन्यांनी कामे मिळवल्याची बाब समोर आली आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या कामांसाठी सिग्नलच्या देखभालीसाठी एआरएस ट्ॅफिक आणि सीएमएस या कंपनीने संगनमत करत देखभालीचे कंत्राट मिळवले आहे. या देखभालीच्या या कामांसाठीतब्बल १३ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

मुंबई क्षेत्र वाहतूक नियंत्रक अर्थात एटीसी प्रकल्पांतर्गत उभारलेल्या वाहतूक नियंत्रकांचे (कंट्ोल रुम) व वाहतूक नियंत्रक (सिग्नल) यांच्या १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी देखभाल व दुरुस्तीसाठी निविदा मागवण्यात आली. मुंबईत सुमारे ६४२ सिग्नल असून एक नियंत्रण कक्ष आहे. यामधील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ए.आर.एस.ट्ॅफिक अँड ट्ान्सपोर्ट टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २ कोटी ०९ लाख रुपयांना १५ महिन्यांच्या कंत्राट कामांसाठी निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर वाहतूक नियंत्रकांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी शहर व पूर्व उपनगरांसाठी सी.एम.एस ट्ॅफिक सिस्टीम तर पश्चिम उपनगरासाठी ट्ॅफिटेक सोल्यशुन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली. या दोन्ही कंपनींना अनुक्रमे ७ कोटी ७१ लाख रुपये आणि ३कोटी १९ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, या निविदांमध्ये तिन्ही कंपन्यांनी संगनमत करून काम मिळवल्याचे उघड होत आहे.

वाहतूक नियंत्रण कक्षाच्या निविदांमध्ये सीएमएस ही कंपनी दुसर्‍या क्रमांकावर होती. परंतु सिग्नलच्या देखभालीसाठी शहर व पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी काढलेल्या पहिल्या निविदांमध्ये सीएमएस या कंपनीने कागदपत्रे सादर न केल्याने त्यांना अप्रतिसादात्मक ठरवले होते. परंतु त्यानंतर काढलेल्या निविदांमध्ये त्याच सीएमएस या कंपनीला शहर व पूर्व उपनगरांमधील कामांची कंत्राटे मिळतात ही आश्चर्यकारक बाब आहे. याच बाबी तिन्ही कंपन्यांमध्ये संगनमत केल्याचे स्पष्ट करतात,असा आरोप भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -