घरमुंबईमास्क न लावल्याने हटकले म्हणून पेव्हर ब्लॉकने महिलेवर केला हल्ला 

मास्क न लावल्याने हटकले म्हणून पेव्हर ब्लॉकने महिलेवर केला हल्ला 

Subscribe

भांडुपमध्ये महापालिकेच्या क्लिन अप मार्शल पथकातील कर्मचाऱ्याने मास्क न लावलेल्या महिलेला हटकले म्हणून त्या महिलेने इतर महिलांच्या मदतीने क्लिन अप मार्शलच्या महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने हल्ला केला.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विना मास्कच्या लोकांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. मात्र, बुधवारी भांडुपमध्ये महापालिकेच्या क्लिन अप मार्शल पथकातील कर्मचाऱ्याने मास्क न लावलेल्या महिलेला हटकले म्हणून त्या महिलेने इतर महिलांच्या मदतीने क्लिन अप मार्शलच्या महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने हल्ला केला. याप्रकरणी तीन महिलांच्या विरेाधात भांडुप पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

क्लिन अपमार्शल महिला जखमी    

भांडुप पश्चिम येथील भांडुप रेल्वे स्थानकाजवळील मोतीबाई चाळ येथे बुधवारी दुपारी ४ वाजता एक महिला मास्क न लावता उभी होती. यावेळी महापालिकेच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या क्लिनअप मार्शलमधील महिला कर्मचारी दर्शना चौहाण यांनी रोहिणी दोंदे यांना हटकले.

- Advertisement -

तीन महिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

दरम्यान, त्या महिलेला हटकल्यानंतर त्यांनी क्लिन अप मार्शलसोबत वादविवाद करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी शिविगाळही केला. हे सुरु असतानाच अन्य दोन महिला तिथे आल्या आणि त्यांनीही क्लिन अप मार्शल महिला कर्मचाऱ्याला मारहाण करत तिथे असलेल्या पेव्हर ब्लॉकने डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर जखमी स्थितीत त्या महिला कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर संबंधित तीन महिलांविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रोहिणी दोंदे यांच्यासह शोभा दोंदे आणि सीमा भंडारे यांच्याविरोधाात कायदेशीर तक्रार नोंदवण्यात आली आहे.


हेही वाचा – वारकऱ्यांसाठी खुशखबर! विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाईनची गरज नाही

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -