घरताज्या घडामोडीभिवंडीत गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला भीषण आग

भिवंडीत गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला भीषण आग

Subscribe

भिवंडी शहरातील गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. यामुळे कारखान्यातील केमिकल भरलेल्या ड्रमचे स्फोट होत आहेत. संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. भिवंडीतील हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे अग्निशमन दल आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. तसेच पोलीस देखील अग्निशमन दलाला मदत करत आहेत.

भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून आगीच सत्र सुरू आहेत. आज अचानक भिवंडी शहरातील गौतम कम्पाऊंड येथील एका कारखान्याला भीषण लागली. यावेळेस कारखाना पूर्णपणे बंद होता. पण आगीमुळे केमिकल ड्रम्सचे स्फोट सातत्याने होत आहेत. यामुळे आगीचा भडका उडाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस देखील अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत आहेत. दरम्यान केमिकल ड्रम्सचे स्फोट होत असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण निर्माण होत आहेत. तरी देखील अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. कारण हा परिसर खूप दाटीवाटीचा आहे.


हेही वाचा – ‘त्या’ दुर्दैवी घटनेचे भाजपकडून घाणेरडे राजकारण : यशवंत जाधव


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -