घरट्रेंडिंगमहापालिकेचे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेगा ऑपरेशन, 56 मार्बलची दुकाने जमीनदोस्त

महापालिकेचे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेगा ऑपरेशन, 56 मार्बलची दुकाने जमीनदोस्त

Subscribe

मुंबई महापालिकेची पश्चिम द्रुतगदी मार्गावर सर्वात मोठी कारवाई

अनेक वर्षे जागा अडवून पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीचा खोळंबा करणाऱ्या मार्बलच्या दुकांनांवर अखेर महापालिकेने कारवाई केली. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुक कोंडीसाठी मोठा अडथळा ठरणाऱ्या तब्बल ५६ मार्बलच्या दुकानांवर अखेर महापालिकेने हातोडा मारला. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. महत्वाचे म्हणजे सर्व्हीस रोडची जागा व्यापून वाहतूक वापरासाठी अयोग्य होईल अशी खबरदारी या मार्बलच्या दुकानादारांनी घेतली होती. महापालिकेनेही मोठा फौजफाटा आणत ही कारवाई करत ही सगळी जागा रिकामी केली. मुंबई विमानतळाच्या भिंती लगतपासून ते पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील बाजुला असणाऱ्या दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ब्युटीफिकेशनसाठी एमएमआरडीने पुढाकार घेतला आहे. त्याच कारवाईचा भाग म्हणून आता या सर्व्हीस रोडवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली.

Marble
महापालिकेची मार्बलच्या दुकानांवर कारवाई
एकुण ५६ दुकाने जमीनदोस्त
एकुण ५६ दुकाने जमीनदोस्त

मान्य असलेल्या जागेपैकी आणि मंजुर असलेल्या जागेपेक्षा मोठ्या प्रमाणात जागा वापरून या दुकानचालकांनी वाहन चालकांची गैरसोय केली होती. मार्बलचा मालवाहतुकीसाठी कायम स्वरूपी थांबलेल्या वाहनांनीही संपुर्ण सर्व्हीस रोड ब्लॉक होत होता. महापालिकेकडून झालेल्या कारवाईमुळे हा सगळा सर्व्हीस रोड वाहन चालकांना वापरता येणार आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीसाठी महापालिकेच्या इमारत व कारखाने विभाग, परिरक्षण विभाग, घनकचरा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यवाहीमध्ये विमानतळाजवळील एटीसी टॉवरपासून ते विमानतळाच्या कार्गो गेटपर्यंत असणाऱ्या अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. या संपुर्ण कार्यवाही दरम्यान विमानतळ पोलिस स्थानकाच्या पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पाहिली.

- Advertisement -

अशी पार पडली कारवाई

कारवाई दरम्यान महापालिकेतर्फे ९ जेसीबी मशीन, दोन लॉरी, ३ गॅसकटर याचा वापर करण्यात आला. तसेच ५० कामगारांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ५६ दुकानांचे मार्बल विक्रेत्यांचे अतिक्रमण, अनधिकृत बोर्डचे बांधकाम, ४६ इतक दुकानांवर आणि झोपड्यांवर अशी मिळून १०२ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -