घरमुंबईमहिलांच्या डब्यात पुरुषांची घुसखोरी

महिलांच्या डब्यात पुरुषांची घुसखोरी

Subscribe

43 हजारांहून अधिकांवर रेल्वेची कारवाई

उपनगरी लोकल सेवाच्या महिल्या डब्यातून पुरुष प्रवाशाची संख्या दिवसेदिवस वाढत जात आहे. गेल्या तीन वर्षात तब्बल 43 हजार 2019 पुरुष प्रवाशांनी महिल्याच्या राखीव डब्यात घुसखोरी केली आहे. रेल्वे पोलिसांनी त्यांच्यावरसुध्दा कारवाई करण्यात आली आहे. मात्र विशेष म्हणजे रेल्वेच्या आकडेवारीत पश्चिम रेल्वे मध्ये सर्वाधिक घुसखोरी झाली आहे. पश्चिम रेल्वेत तीन वर्षात 35 हजार 870 पुरुष प्रवाशांनी महिला डब्यातून प्रवास केला असल्याची माहिती समोर आली असून ही घुसखोरी रेल्वे पोलिसांसाठी डोकेदुुखी वाढली आहे.

लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) प्रयत्न केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी वाशी ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणार्‍या एका मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे आणि पुरुष प्रवाशांना महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करण्यास मनाई करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

- Advertisement -

यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वे पोलिसांकडून प्राधान्य दिले जात आहे. तरीही महिला प्रवाशांच्या बाबतीतले गुन्हे काही कमी होताना दिसत नाहीत. यात विविध गुन्ह्यांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पुरुष प्रवाशांवर कारवाई केली आहे. 2017- 19 मध्ये मध्य रेल्वे मार्गावर 7 हजार 349 पुरूषांवर कारवाई करण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वेवर 2017- 19 मध्ये 35 हजार 804 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

वर्ष – मध्य रेल्वे – पश्चिम रेल्वे
2017 – 2198 – 10938
2018 – 2902 – 12128
2019 ऑगस्टपर्यंत – 2249 – 10804
……………………………………..
एकूण -7349 -35870
………………………………………

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -