घरमुंबईम्हाडामध्ये गिरणीकामगारांसाठीच्या घरांची सोडत सुरू!

म्हाडामध्ये गिरणीकामगारांसाठीच्या घरांची सोडत सुरू!

Subscribe

गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची सोडतीला सुरूवात झाली आहे. म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंड स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांसाठी ही सोडत निघत आहे.

मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याच्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पातंर्गत ७२० सदनिक बांधण्यात आल्या आहेत. तसेच बॉम्बे डाईंग येथे २६३० सदनिका आणि लोअर परळ येथील श्रीनिवास मिलच्या जागी ५४४ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्वात अच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील २२५ चौरस फुटांच्या वन बीएचके स्वरूपातील सदनिका अत्याधुनिक सोयीसुवीधांनी युक्त आहेत.

- Advertisement -

हा कौटुंबिक कार्यक्रम, सगळे परिवरतले आहेत. गिरणी कामगार मराठी माणूस आमच्या जवळचा विषय आहे. शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना काही दिल, पण सेना गिरणी कांमगार आणि मराठी माणसांच्यामुले उभी राहिली. माझा जन्म मुंबईत झाला. महाराष्ट्राला मुंबई सहजासहजी मिळाली नाही ती लढा देऊन मिळवली होती. गिरणी कामगार तेव्हा रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई नसती मिळाली महाराष्टाला. असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

२०१० मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फ त गिरणी कामगारांची माहिती संकलित करण्याकरता विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान गिरणी कामगारांकडून एकू ण १ लाख १० हजार ३२३ अर्ज प्राप्त झाले. मृत गिरणी कामगारांच्या वारसांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून २०११ मध्ये पुन्हा गिरणी कामगार वारसांकडून अर्ज मागवण्यात आले. त्यानुसार ३८ हजार ३८८ अर्ज प्राप्त झाले. या दोन्ही मोहिमांतर्गत सहभागी न होऊ शकलेल्या अर्जदारांना समाविष्ट करून घेण्याकरता सन २०१७ मध्ये पुन्हा माहिती संकलन मोहीम राबवण्यात आली. अशा प्रकारे एकू ण १ लाख ७४ हजार ३६ अर्ज गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून प्राप्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -