घरमुंबईमहापालिका शाळांसाठी मोबाइल अ‍ॅप

महापालिका शाळांसाठी मोबाइल अ‍ॅप

Subscribe

मुंबईतील पालिका शाळांचा खालावत असलेला दर्जा सुधारण्यासाठी पालिकेने कंबर कसलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून यात नवनवीन बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर आता पालिका शाळांसाठी मोबाइल अ‍ॅप्स विकासित करण्याची मागणी शिक्षण समितीत करण्यात आली आहे. या मोबाइल क्लिकप्रमाणेच पालिका शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीची सभा नुकतीच महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी ही मागणी केली असून, या मागणीला इतर अनेक सदस्यांनी पाठिंबा दर्शविल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यात सध्या आंतरराष्ट्रीय आणि खासगी शाळांचे जाळे गडद होत चालले असून, या शाळांकडे पालकांचा ओढा अधिक वाढत आहे. त्यातच पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती वाढत असल्याने प्रशासनाने पालिका शाळांमध्ये अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मोबाइल अ‍ॅप्सची मागणी करण्यात आली आहे. जेणेरून पालिका शाळांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे. या मोबाइल अ‍ॅप्स प्रमाणेच पालिका शाळांची माहिती पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मागणी करतानाच यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, पालिका शाळांमध्ये सध्या अनेक गोष्टींची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, परंतु ती आजही लोकांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे पीआरओ कंपनी नियुक्ती करावी, अशी मागणीदेखील साईनाथ दुर्गे यांनी यावेळी केली आहे. त्याचबरोबर पालिकेकडून देण्यात येणार्‍या विविध सुविधेअंतर्गातील पैसे हे विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

शाळांच्या गच्छीवर गार्डन हवे
मुंबई महापालिका शाळांच्या इमारतीवर थीम बेस गार्डन सुरू करावे, अशी मागणी साईनाथ दुर्गे यांनी केली आहे. या गार्डनचा वापर विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि मनोरजनांच्या दृष्टीकोनातून होणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -