घरमुंबईचोर चौकीदाराच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे कसे बसणार?

चोर चौकीदाराच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे कसे बसणार?

Subscribe

अडीच वर्षानंतर मोदी-उध्दव ठाकरे एकाच मंचावर

शिवसेना-भाजप युतीची मंगळवारी उस्मानाबाद येथे जाहीर सभा होत असून तब्बल अडीच वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकत्र येत आहेत. मात्र, पंतप्रधानांनी पक्षाच्या राजकीय सभांमध्ये सहभागी होवू नये. पंतप्रधान हे देशाचे असतात,असे वक्तव्य करणार्‍या उध्दव ठाकरेंना आता युतीच्या प्रचारासाठी मोदी कसे चालतील असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे पंढरपूर येथील जाहीर सभेत तर उध्दव ठाकरे यांनी चौकीदार चोर है,असे संबोधत पंतप्रधान नरेंदी मोंदीवर जोरदार टिका केली होती, त्याच चोर चौकीदारांच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरेंना बसायला आवडेल का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सत्ता स्थापन झाल्यानंतर पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात अभावाने सख्य पाहायला मिळत आहे. मोदी आणि ठाकरे हे अडीच वर्षांपूर्वी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपुजन सोहळयात सार्वजनिक कार्यक्रमात भेटले होते. त्यानंतर आता आता उस्मनाबाद येथील सभेत मंगळवारी त्यांची भेट होणार आहे.मागील विधान सभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीत स्वबळाची भाषा करत शिवसेनेने एकला चलो रेचा नारा देत भाजप विरोधी विधाने केली हेाती. त्यामुळेच मुंबईत मोदी आणि ठाकरे एकत्र आल्यानंतरही दोघांच्याही देहबोलीत बदल पहायला मिळाला होता. युतीतल्या मतभेदांनी टोक गाठल्यानेच मोदींनी ठाकरेंशी तेवढासा सुसंवाद साधलेला नव्हता. त्यानंतर १० एप्रिल २०१७ला दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला उध्दव ठाकरे उपस्थित राहिले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यालाही उध्दव ठाकरेंनी जुजबी समर्थन दिले होते. परंतु जानेवारी २०१८ला पक्षाच्या राष्ट्ीय कार्यकारणीत उध्दव ठाकरेंनी स्बबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे शिवसेना आणि भाजप संघर्षाला आणखी धार चढली होती. टीडीपीने लोकसभेत मोदी सरकार विरोधात मांडलेला अविश्वास ठरावाच्यावेळी बहिष्कार टाकत शिवसेनेने आपले इरादे स्पष्ट केले होते.

- Advertisement -

मित्रपक्ष एकामागोमाग एक एनडीएतून बाहेर पडत असताना, सावध भाजपला अचानक आपल्या सर्वात जुन्या पक्षाच्या सोबतीची गरज वाटू लागली आणि उध्दव ठाकरेंची पर्यायाने शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. युती करण्यासाठी पुन्हा अमित शहा यांना मातोश्रीची पायरी चढावी लागली. पण उध्दव ठाकरेंनी स्वबळाचा मुद्दा कायम ठेवला हेाता. पण पुलवामातील जवानांवरील झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर बालकोट मध्ये करण्यात आलेला सर्जिकल स्ट्ाईक आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या देशभक्तीच्या ज्वरामुळे संपूर्ण वातावरण बदलून निघाले. मग उध्दव ठाकरे यांनीही काळाची पावले ओळखून आणि हिंदुत्व या समान मुद्दयाचे कारण पुढे करत पुन्हा युतीचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा मोदी व ठाकरे यांनी एकमेकाशीं हातमिळवणी केली. त्यामुळे एकमेकांवर हल्लोबल करणारेच आता मांडीला मांडी ल ावून ते आता आपल्या राजकीय विरोधकांवर जोरदार हल्ला चढवतील. पण मतभेदांचे रुपांतर मनभेदात झालेले असले तरी यापूर्वी उध्दव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधत केलेल्या चुकांचा विसर पडत नाही. शिवसेनेच्या २०१७च्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरेंनी मोदी सरकारवर केलेल्या टिकेचा विसर आता युती झाल्यानंतर शिवसेना व भाजपच्या पदाधिकार्‍यांना पडला असेल का प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -