घरमुंबईमोनोरेलला मेट्रो, उपनगरीय रेल्वे स्थानके जोडणार

मोनोरेलला मेट्रो, उपनगरीय रेल्वे स्थानके जोडणार

Subscribe

कनेक्टीव्हीटी वाढवण्याचा प्रयत्न

मोनोरेलची स्थानके ही वाहतूक उपक्रमांशी इंटिग्रेट करण्याच्या रेल्वेमंत्री पियूष गोएल यांच्या सूचनेची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुरूवातीच्या टप्प्यात मेट्रो मार्गाला सध्याची मोनोरेलची स्थानके कनेक्ट करण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नात आहे. तर काही ठिकाणी रेल्वे स्थानकांशीही मोनोरेल स्थानके जोडण्याचा विचार एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे.

सध्या चेंबूर, वडाळा, जीटीबी नगर आणि लोअर परळ, महालक्ष्मी ही स्थानके हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या अतिशय नजीकची स्थानके आहेत. तर मेट्रो ३ च्या मार्गावर महालक्ष्मी स्थानकाचा कनेक्ट मोनोरेलशी होणार आहे. मेट्रो २ बी च्या मार्गावर व्ही.एन पुरव मार्ग हे मोनोरेलशी कनेक्ट होईल. मेट्रो ४ च्या मार्गावर भक्ती पार्क हे मोनोरेलचे स्टेशन मेट्रोशी कनेक्ट होईल.

- Advertisement -

पियूष गोएल यांनी आधीच विविध वाहतूक सुविधा या मोनोरेलशी कनेक्ट करण्याचे आवाहन एमएमआरडीए आयुक्तांना केले होते. त्यामुळेच आता मेट्रोच्या निमित्ताने मोनोरेलचे विविध सेवांशी इंटिग्रेशन करण्यासाठीचे पाऊल टाकण्यात आले आहे. मोनोरेलच्या सेवांशी यापुढच्या काळात बेस्ट उपक्रमाची सेवाही जोडण्याचा विचार आहे. तसेच मोनोरेलपासून रेल्वेशी थेट कनेक्टिव्हिटी करण्यासाठीचेही प्रयत्न करण्यात येतील, असे एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

सध्या स्टेशन परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरवठ्याची सुविधा, बसण्यासाठी बेंचची सुविधा तसेच अनेक स्थानकांमध्ये शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोनोरेलकडून सुरूवात झाली आहे. आगामी दिवसात सध्याच्या कमी असणार्‍या मोनोरेलच्या फेर्‍या वाढवण्याच्या दृष्टीनेही आणखी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मोनोरेलचे स्पेअर पार्ट आणि नवीन मोनोरेलची खरेदी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -