घरमुंबईमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत १४ लाख दशलक्ष लिटरपेक्षाही जास्त साठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत १४ लाख दशलक्ष लिटरपेक्षाही जास्त साठा

Subscribe

मुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या १४ लाख दशलक्ष लिटर पेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ३६४ दिवस (वर्षभर) म्हणजेच पुढील २० ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीकपातीची चिंता करण्याची गरज नाही.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यंदा जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे पालिकेला मुंबईत १० टक्के पाणी कपातीचा फटका बसला. मात्र जुलै महिन्यापासून तलाव क्षेत्रांत चांगला पाऊस पडल्याने मोडक सागर, विहार, तानसा व तुळशी हे चार तलाव सप्टेंबर महिना संपण्यापूर्वीच वाहू लागले. तसेच, सध्या उर्वरित भातसा, मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा हे तिन्ही तलाव ९६ टक्के भरले आहेत.

- Advertisement -

मुंबईला पावसाळा संपल्यानंतर पुढील वर्षभरासाठी तलावांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा असणे आवश्यक असते.त्या तुलनेत सध्या सात तलावांत एकूण १४ लाख २ हजार ६१६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. अद्यापही पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी एक म्हणजे सप्टेंबर महिना बाकी आहे. त्यामुळे अजूनही सप्टेंबर महिन्यात तलावांत चांगला पाऊस पडून सातही तलाव संपूर्णपणे म्हणजे १०० टक्के भरून वाहू लागतील.

सात तलावातील पाणीसाठा, टक्केवारी –
———————————————————-
तलाव                    पाणीसाठा       टक्केवारी

- Advertisement -

उच्च वैतरणा             २,१८,८५०        ९६.३९

मोडकसागर             १,२८,९२५        १००.००

तानसा                    १,४३,५३४       ९८.९३

मध्य वैतरणा              १,८६,२३६       ९६.२३

भातसा                    ६,८९,३२७       ९६.१४

विहार                     २७,६९८          १००.००

तुळशी                     ८,०४६            १००.००
———————————————————-
एकूण –                    १४,०२,६१६       ९६.९१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -