घरताज्या घडामोडी२ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी घेतला आपल्या दवाखान्यांचा लाभ

२ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी घेतला आपल्या दवाखान्यांचा लाभ

Subscribe

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यांचे लोकार्पण करण्यात आले होते.

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यांचे लोकार्पण करण्यात आले होते. आतापर्यंत ६६ दवाखान्यांमधून २ लाख ६ हजार ४४८ नागरिकांनी वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. (More than 2 lakh Mumbaikars have benefited from Apala clinic)

सध्या ६६ ठिकाणी आपले दवाखाने कार्यरत असून, ही संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत १०० इतकी वाढविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ येथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

- Advertisement -

या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपले दवाखाने हे प्रामुख्याने सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते  रात्री १० या कालावधीदरम्यान कार्यरत आहेत.

या दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरण पूरक होत आहे, असा दावाही पालिकेने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विलेपार्लेतील महिलेवर अहमदाबादेत सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -