घरताज्या घडामोडीवर्षातून दोनदा होणार अग्निवीरांची भरती, ऑगस्टमध्ये पहिली तुकडी भारतीय लष्करात होणार दाखल

वर्षातून दोनदा होणार अग्निवीरांची भरती, ऑगस्टमध्ये पहिली तुकडी भारतीय लष्करात होणार दाखल

Subscribe

अग्निपथ योजनेला देशभरातून कडाडून विरोध झाला. ज्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. त्याच अग्निपथ योजनेकडे राज्यातील तरूण आकर्षित होताना दिसत आहेत. नाशिक आणि अहमदनगरमध्ये पहिल्या तुकडीतील अग्निवीरांना प्रशिक्षण दिलं जात आहे. अहमदनगरमध्ये १८०० अग्निवीरांना प्रशिक्षण दिलं जात आहे. पहिल्या तुकडीला तोफखान्यात प्रशिक्षण दिलं जात आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षातून दोनवेळा अग्निवीरांची भरती होणार आहे. तर ऑगस्टमध्ये पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे.

लष्कराच्या नवीन भरती योजनेंतर्गत नियुक्त केलेल्या १९ हजार अग्निवीरांची पहिली तुकडी ऑगस्ट महिन्यात आपापल्या लष्करात दाखल होणार आहे. तसेच १ मार्चपासून जवळपास २१ हजार अग्निवीरांच्या दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. तसेच दुसरी तुकडी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या लष्करात दाखल होणार आहे. वर्षातून मे आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांसाठी अग्निवीरांची भरती केली जाणार आहे.

- Advertisement -

अग्निवीरांचा प्रशिक्षण कालावधी २४ ते ३१ आठवड्यांचा…

लष्कराच्या विविध तुकड्यांमधील अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाला १ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. त्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित लष्करात विशेष प्रशिक्षण वर्गाची रचना केली आहे. अग्निवीरांचा प्रशिक्षण कालावधी २४ ते ३१ आठवड्यांचा असतो. जो यापूर्वी जवानांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या तुलनेने कमी आहे.

- Advertisement -

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत १०० महिलांचा समावेश आहे. २०२२मध्ये ४० हजार अग्निवीरांची भरती करण्यासाठी देशभरात ९६ भरती मेळावे घेण्यात आले. १९ हजार अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. तर अग्निवीरांच्या दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण १ मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच महिला अग्निवीरांची पहिली तुकडीही ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या लष्करात दाखल होणार आहे.


हेही वाचा : मिशन अमृत सरोवर : महाराष्ट्रासह विविध राज्यांत भारतीय सैन्याने केले सरोवरांचे पुनरुज्जीवन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -