घरक्राइमविलेपार्लेतील महिलेवर अहमदाबादेत सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक

विलेपार्लेतील महिलेवर अहमदाबादेत सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक

Subscribe

मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये या महिलेवर बलात्कार झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये या महिलेवर बलात्कार झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. लालासाहेब सुखनाथ यादव आणि शशांक संजय सावंत अशी या दोघांची नावे आहेत. (Vile Parle Woman Gang Raped In Ahmedabad Two Arrested By Mumbai Police)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

मुंबईत विलेपार्ले येथे राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला होता. पोलीसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. मात्र तिसऱ्या आरोपीचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. या तिघांविरुद्ध सामूहिक लैगिंक अत्याचार, विनयभंग आणि धमकी दिल्याच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव लालसाहेब असून तो पीडित महिलेच्या ओळखीचा आहे. संबंधित पीडित महिला तिच्या पती मुलांसोबत विलेपार्ले परिसरात राहते. लालासाहेब कांदिवली परिसरात राहत असून तो तिचा जवळचा मित्र आहे. ते दोघेही गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अनेकदा आरोपी लालासाहेब याचे महीलेच्या विलेपार्ले येथील राहत्या घरी येणे जाणे होते.

- Advertisement -

शुक्रवारी 6 जानेवारीला आरोपी लालासाहेबने तिला आपल्यासोबत कारने अहमदाबाद येथे नेले. यावेळी त्यांच्यासोबत इतर दोन आरोपी गाडीत त्यांच्यासोबत होते. लालासाहेब याने इतरासोबत मद्यप्राशन केले. त्यानंतर दारुच्या नशेत तिन्ही आरोपींनी महिलेशी सामूहिक बलात्कार केला.

7 जानेवारीला मुंबईत येताच पीडित महिलेने सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर महिलेच्या पतीने विलेपार्ले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तपासाला सुरूवात करत दोन आरोपींना अटक केली. पोलीस या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे.


हेही वाचा – पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी-कारचा भीषण अपघात, परिसरात भीतीचं वातावरण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -