घरताज्या घडामोडीमुंबई आहे की दिल्ली? धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

मुंबई आहे की दिल्ली? धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Subscribe

कंपनीने कामावर येण्याजाण्यासाठी दिलेल्या गाडीतच एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मुंबईतील मानखुर्द येथे उघडकीस आली आहे. मानखुर्द पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. फिरवण्याच्या बहाण्याने या तिघांनी ईस्टर्न फ्री वे मार्गावर धावत्या मोटारीतच मुलीवर सामूहिक अत्याचार केला असल्याची माहिती पोलिसानी दिली.

सोनू उर्फ दीपक धनसिंग सिंग (२५), नुरुल हसन मेहबूब हसन नालवार (२५) बाबा अली हकीम अन्सारी (२२) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही गोवंडीतील बैगण वाडी, शिवाजी नगर येथे राहणारे आहेत. या तिघांपैकी एकाला कंपनीने लॉकडाऊनमध्ये कामावर येण्यासाठी कार दिलेली होती. २९ जुलै रोजी रात्री मानखुर्द येथे राहणारी १५ वर्षाची मुलगी आपल्या मैत्रिणीला भेटून घरी जात असताना तिच्या पुढ्यात वॅगनार मोटार येऊन थांबली. घरी सोडतो असे सांगून मोटारीत असलेल्या तिघांनी तीला मोटारीत बसवून मोटार थेट पूर्व मुक्त मार्गांवर (ईस्टर्न फ्री वे) वर घेऊन धावत्या मोटारीतच तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिला एकटीला मानखुर्द पीएमजीपी वसाहत येथे सोडून या तिघांनी पळ काढला. घाबरल्यामुळे तिने घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही. तिच्या वागण्यामुळे कुटुंबातील लोकांना संशय येताच त्यांनी तीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिच्यासोबत झालेला धक्कादायक प्रकार समोर आला.

- Advertisement -

पीडित मुलीच्या काकांनी या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मानखुर्द पोलिसानी मुलीचा जबाब नोंदवून तीन जणांविरुद्ध अपहरण, सामूहिक अत्याचार, विनयभंग, धमकी देणे आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपीचा शोध घेऊन तिघांना शिवाजी नगर, बैगण वाडी येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती मानखुर्द पोलिसानी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -