घरक्राइमMumbai Crime : मुंबईत वृद्धांची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर? चोरी करून वृद्ध...

Mumbai Crime : मुंबईत वृद्धांची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर? चोरी करून वृद्ध महिलेची केली हत्या

Subscribe

Mumbai Crime : मुंबईतील ताडदेव परिसरात एका वृद्ध पती पत्नीचे चिकटपट्टीने हात बांधून, तोंडात कापसाचा बोळा कोंबून, चोरी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब अशी की, चोरांनी वृद्ध महिलेची हत्या केली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शबविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपींनी घराची रेकी केल्याचा संशय पोलिसांनी आहे. त्यांनी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. (Mumbai Crime The safety of the elderly in Mumbai once again in the wind An old woman was killed by stealing)

ताडदेवच्या मेन रोड परिसरात रविवारी (13 ऑगस्ट) सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. युसुफ मंझिलमध्ये राहणाऱ्या वृध्द पती पत्नीच्या घरात आरोपींनी प्रवेश केला. त्यांनी पती पत्नीचे हात पाय चिकटपट्टीने बांधले आणि तोंडात कापसाचा बोळा कोंडला. परंतु यामुळे 70 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेखा मदन अग्रवाल असे मृत महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

मृत महिलेचे पती मदन अग्रवाल हे सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर जात होते. यावेळी चार ते पाचजणांनी त्यांना घरामध्ये ढकलले. यानंतर आरोपींनी पती पत्नीचे दोरी आणि चिकटपट्टीच्या मदतीने हात पाय बांधून दागिन्यांची चोरी केली आणि पसार झाले. याप्रकरणी ताडदेव पोलीस व गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

दाम्पत्य एकटे असल्याने त्यांना टार्गेट केल्याचा पोलिसांना संशय

वृद्ध दाम्पत्य घरात एकटे राहत असल्याने आरोपींनी त्यांना टार्गेट केल्याचा पोलिसांनी संशय आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी पसार झालेल्या टॅक्सी ड्रायव्हरला मरीन ड्राईव्हर परिसरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी टॅक्सी ड्राव्हरची चौकशी केली असता त्याने दावा केला आहे की, इतर  प्रवाशांप्रमाणे त्याने आरोपींना सोडले. तसेच प्रवसादरम्यान आरोपींमध्ये अशा कोणत्याही घटनेची चर्चा झाली नाही. त्यामुळे पोलीस आरोपीला शोधण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेत आहे.

हेही वाचा – हुकूमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचंय; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला निशाणा

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ताडदेवमधील घटनेनंतर मुंबईत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या घटनेनंतर घरात एकटे राहणाऱ्या वृद्धांनी घराजवळ असलेल्या पोलीस ठाण्यात आपली माहिती द्यावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न फार पूर्वीपासून आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -