घरताज्या घडामोडीमुंबई सीमाशुल्क विभागाने सुमारे 270 किलो अंमली पदार्थ केले नष्ट

मुंबई सीमाशुल्क विभागाने सुमारे 270 किलो अंमली पदार्थ केले नष्ट

Subscribe

मुंबई सीमाशुल्क विभाग (क्षेत्र I)ने  बुधवार २९ डिसेंबर २०२१ रोजी २६९ किलो अंमली आणि मनोवर्ती पदार्थ नष्ट केले.या अंमली पदार्थांमध्ये १९१.६० किलो हेरॉईन, ६५.२० किलो मेफेड्रोन, १०.०२ किलो केटामाइन आणि १.८६ किलो फेनाईलप्रोपॅनोलामाइनचा समावेश आहे.

सीमाशुल्क,महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या अंमली पदार्थ  विल्हेवाट समितीच्या उपस्थितीत या अंमली पदार्थाची जाळून विल्हेवाट लावण्यात आली. या अधिकाऱ्यांमध्ये अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे क्षेत्रीय संचालक, सहआयुक्त आणि उपायुक्त (सीमाशुल्क),महसूल गुप्तचर विभागाचे अतिरिक्त संचालक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.यापूर्वी हे अंमली पदार्थ  महसूल गुप्तचर संचालनालयाचे मुंबई क्षेत्रीय विभागाने  दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जप्त केले होते.

- Advertisement -

ड्रग्ज नष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

वित्त मंत्रालयाच्या २०१५ च्या अधिसूचनेनुसार,प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीला ड्रग ड्रग डिस्पोजल (डीसीसी) कमिटी स्थापन करावी लागते. मुंबई पोलिसांमध्ये सहआयुक्त या समितीचे प्रमुख असतात ज्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) आणि पोलीस उपायुक्त (एएनसी) यांचा समावेश असतो. दर काही महिन्यांनी डीसीसी एक बैठक घेते.त्यानंतर सीए अहवाल आला की, अधिसुचनेव्दारे समिती ड्रग्स नष्ट करण्याचा निर्णय घेते.


हे ही वाचा – Coastal Road: कोस्टल रोडचे ३ वर्षात ५० टक्के काम; बोगद्याचा २ किलोमीटर टप्पाही पूर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -