घरमुंबईगणेश मंडळांकडून यंदा टी- शर्टवर सामाजिक संदेश

गणेश मंडळांकडून यंदा टी- शर्टवर सामाजिक संदेश

Subscribe

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या पाद्यपूजनाचे दिमाखदार सोहळे पार पडत आहेत, कार्यकर्ते यासाठी जोरदार तयारी करत आहेत. गणेश मंडळांमध्ये टी-शर्टचा ट्रेंड तसा नवीन नाही, पण गेल्या वर्षापासून या टी-शर्टमध्ये सामाजिक संदेश छापण्यास सुरुवात झाली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या पाद्यपूजनाचे दिमाखदार सोहळे पार पडत आहेत, कार्यकर्ते यासाठी जोरदार तयारी करत आहेत. गणेश मंडळांमध्ये टी-शर्टचा ट्रेंड तसा नवीन नाही, पण गेल्या वर्षापासून या टी-शर्टमध्ये सामाजिक संदेश छापण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळाचा हा टी-शर्ट चर्चेचा विषय बनला आहे. पूर्वी संस्कृती आणि परंपरेसोबत समाज प्रबोधनाचे कार्यक्रम देखील व्हायचे. मात्र आजच्या या बदलत्या काळात टी- शर्ट वर देखील सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध फोर्टचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी आपल्या आगमन सोहळ्यात आपल्या टी-शर्ट द्वारे “सर्वतोपरी पर्यावरण, अनुकूल बनवू वन्यजीवन” चा सामाजिक संदेश देणार आहे. या सोबतच वृक्षारोपणचे उपक्रम देखील राबवणार आहे. तर दुरीकडे विलेपार्ले येथील बाळ गोपाळ मित्र मंडळ म्हणजेच मुंबईचा पेशवा यांनी आपल्या टीशर्ट द्वारे आपल्या देशातील सैनिकांना मान वंदना दिली आहे. यासॊबत गणेश भक्तांना सैनिकांसोबत आदर आणि सैनिक भरतीसाठी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर देखील राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

संस्कृती आणि परंपरेचे पालन करत असताना सोबत समाजप्रबोधन आणि जनजागृतीदेखील व्हावी. पर्यावरण आणि वन्य जीवनाचे रक्षण या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
नयन डुंबरे, सेक्रेटरी, फोर्टचा राजा

आपण येथे सुखरूप रहावे म्हणून आपल्यासाठी सतत झटणारे सीमेवर असलेले आपले सैनिक यांच्याबद्दल अभिमान आणि शहिदांना मान वंदना देण्यासाठी आमचा प्रयत्न. यासोबतच आपल्या राष्ट्रीय ध्वज ही आपली शान आणि आपले जवान आपला अभिमान आहे, असा संदेश देण्याच्या संकल्प केला आहे.
अमेय खापले,सेक्रेटरी, मुंबईचा पेशवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -