घरमुंबईचौपदरीकरणाच्या कामाचा सावळा गोंधळ

चौपदरीकरणाच्या कामाचा सावळा गोंधळ

Subscribe

पोलादपूरची जनता त्रस्त , नगराध्यक्षांचा उपोषणाचा इशारा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये नॅशनल हायवे सर्वेक्षण पथक आणि अभियंते यांच्यात समन्वय नसल्यामुळे कामाचा सावळा गोंधळ उडाल्याचे समोर येत आहे. यामुळे येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगराध्यक्ष नीलेश सुतार यांनी या विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे.

सध्या चौपदरीकरणाचे काम शहरातील प्रभात नगरमध्ये सुरू करताना मूळ रस्त्याच्या पातळीपेक्षा गटाराचा तळ आणि त्यावरील गटार ही उंची कमीत कमी चार फुटाने वाढणार आहे. त्यामुळे येथील अवती भवती असणार्‍या वस्तीतील रहिवाशांचा जाण्या-येण्याचा मार्ग अडचणीत येणार आहे. सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाणे अशक्य असल्यामुळे बिकट समस्या उद्भवणार आहेत. चौपदरीकरण करताना ते संबंधित यंत्रणांना जसे करायचे असेल तसे करावे व त्यासाठी स्थानिकांची आडकाठी नाही. मात्र रस्ता व गटाराची पातळी दुतर्फा वस्तीच्या भौगोलिक रचनेप्रमाणे केले जावी, अशी या स्थानिकांची ठाम मागणी आहे. या मागणीचा विचार न झाल्यास नगराध्यक्ष सुतार यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

तत्पूर्वी झालेल्या चर्चेत नॅशनल हायवेचे गायकवाड व ग्लुम कंपनीचे कडवे यांच्यासमोर मनोज भागवत, दिलीप भागवत, सचिन शेठ, राजू धुमाळ, विजय पवार, वसंत जाधव व प्रसाद प्रभुदेसाई यांच्यासह इतरांनी समस्या मांडली. सुतार व स्थानिक नगरसेवक सवादकर समस्या समजावून घेऊन यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देत पावसाळ्यापूर्वी नॅशनल हायवेकडून सर्व समस्या मार्गी लावू, असे सर्वांना आश्वस्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -