घरमुंबईमुद्रांक शुल्क वाढीची अफवा; कोणतेही अधिकृत पत्र नाही

मुद्रांक शुल्क वाढीची अफवा; कोणतेही अधिकृत पत्र नाही

Subscribe

 

मुंबईः मुंबई महापालिका क्षेत्रात मुंद्राक शुल्कवाढ होणार असल्याची अफवा सध्या सुरु आहे. याचे कोणतेही अधिकृत पत्र जारी झालेले नाही, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

येत्या शनिवारपासून म्हणजेच १ एप्रिल पासून मुद्रांक शुल्कवाढ होणार असल्याची चर्चा सुर होती. मुंबई महापालिका क्षेत्रात सहा टक्के मुद्रांक शुल्क आहे. त्यात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. हा एक टक्का म्हणजे मेट्रोचा अधिभार आहे. हा अधिभार गृह खरेदीरांकडून वसुल केला जात आहे, असे बोलले जात होते.

मात्र अशी कोणीतीही वाढ केली नसल्याचे मुद्रांक शुल्क उपमहानिरीक्षक एस. एन. दुतोंडे यांनी स्पष्ट केले. मुद्रांक शुल्क वाढीचे कोणतेही पत्र सरकार किंवा मुख्यालयाकडून प्राप्त झाले नाही. तसेच दरबदल करायचे असल्यास त्याबाबतचे पत्र सहसा इतक्या ऐन वेळी येत नाही. यासाठी संगणकीय प्रणालीत तसे आवश्यक बदल करावे लागतात. त्यास कालावधी लागतो. त्यामुळे २९ मार्चनुसार तरी आहे तेच दर एप्रिल महिन्यातदेखील कायम राहतील’ असे दुतोंडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. पीएम आवास योजनेवरील खर्चात 66 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला सरकारने घेतला आहे. या वाढीमुळे पीएम आवास योजनेवरील खर्च 79,000 कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना पीएम आवास योजनेतून सवलत मिळणार आहे.

2022 -23 या आर्थिक वर्षात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएम आवास योजनेसाठी 48,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. देशातील सर्व लोकांना स्वत:चं घरं देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे स्वत:चं कायमस्वरुपी घर नाही त्यांना घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते.

मात्र मुद्रांक शुल्क वाढीच्या चर्चेंने घराच्या किमतींमध्ये वाढ होईल, असे बोलले जात होते. तूर्त तरी ही दरवाढ होणार नसल्याने घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -