घरमनोरंजनराम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर

राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर

Subscribe

टॉलिवूड सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट सतत समोर येत असतात. मागील काही महिन्यांपूर्वी ‘आदिपुरुष’चे पहिले पोस्टर आणि टीझर शेअर करण्यात आला होता. मात्र, नेटकऱ्यांनी या टीझरलर आक्षेफ घेत चित्रपटाच्या टीमला ट्रोल केले होते. दरम्यान, आता अशातच आज रामनवमीच्या शूभ मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर काही क्षणातच हा पोस्टर प्रचंड व्हायरल होत आहे.

रामनवमीच्या शूभ मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर शेअर केले आहे. ज्यात प्रभास भगवान श्रीरामाच्या भूमिकेत दिसत आहे. यासोबतच सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन दिसत आहे कृतीने यात साधी साडी आणि शाल परिधान केली आहे. तर प्रभासच्या दुसऱ्या बाजूला लक्ष्मणची भूमिका साकारणारा अभिनेता सनी सिंग दिसत आहे. तर खाली गुडघ्यांवर श्रीरामांना नमन करणारा हनुमान दिसत आहे. अभिनेता देवदत्त नागेने ही भूमिका साकारली आहे.

- Advertisement -

पोस्टर पाहून चाहते खूश

प्रभासने पहाटे हे पोस्टर शेअर करत रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. हे पोस्टर चाहत्यांना प्रचंड आवडलं. हे पोस्टर शेअर करत प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुझे नाव मंत्रांपेक्षा मोठे आहे, जय श्री राम’.

रामनवमीनिमित्त प्रभासच्या या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर चाहते आनंदी झाले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘जय श्री राम’. दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘रेकॉर्ड ब्लास्ट होणार हा चित्रपट’. दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हे खूप छान पोस्टर आहे, ज्याचा लूक खूप चांगला आहे आणि तो पूर्ण आदराने सादर करण्यात आला आहे’.

- Advertisement -

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

प्रभास आणि कृति सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’ सारख्या चित्रपटानंतर प्रभासला या अवतारात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.


हेही वाचा :

विराट कोहलीचं कतृत्व मोठं की शाहरुख खानचं? दोघांच्या चाहत्यांमध्ये रंगलं ट्ववीटर वॉर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -