घरमुंबईमुंबईकरांचा लोकल प्रवेश, पुढील आठवड्यातील बैठकीत होणार शिक्कामोर्तब

मुंबईकरांचा लोकल प्रवेश, पुढील आठवड्यातील बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Subscribe

११ आणि १२ डिसेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक होणार

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. यादरम्यान मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन देखील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठप्प होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे लक्षात येता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर महिलांना देखील ठराविक वेळेत प्रवास करण्याची मंजुरी दिली गेली. असे असले तरी मुंबईतील चाकरमानी, सर्वसामान्य नागरिक लोकल कधी सुरू होणार, याच्या प्रतिक्षेतच आहे. दिवाळीनंतर असलेल्या कोरोनाची परिस्थिती बघता प्रशासनाकडून मुंबईत लोकल प्रवास सर्वांसाठी खुला करावा, यासाठी महत्त्वाच्या हालचाली आणि बैठकी सुरू असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, येत्या आठवड्यात यासंबधी महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. तर या बैठकीत लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

११ आणि १२ डिसेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. १५ डिसेंबरनंतर सर्वांसाठी लोकलप्रवास खुला करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर येत्या ११ आणि १२ डिसेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी कोरोनाची परिस्थितीचा अंदाज घेऊन लोकल प्रवासाचा निर्णय घेण्यात येईल.

- Advertisement -

सर्वसामान्यांसाठी १५ डिसेंबरनंतरच धावणार!

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईची लाईफलाईन सुरू होण्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी असे सांगितले की, “मुंबईत सध्या दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्या आमचं याकडे लक्ष आहे. यामुळे मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय हा १५ डिसेंबरनंतर घेऊ.”


मसाल्यांचा बादशाह ‘MDH’ कंपनीच्या मालकाचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -