घरCORONA UPDATELockdown - मुस्लिम डिलिव्हरी बॉय असल्यामुळे कुटुंबाने नाकारलं सामान!

Lockdown – मुस्लिम डिलिव्हरी बॉय असल्यामुळे कुटुंबाने नाकारलं सामान!

Subscribe

अखेर पोलिसांनी मीरा रोड येथे राहणाऱ्या चर्तुर्वेदी यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनवली आहे.

देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. लोकांना अत्यालश्यक सेवेसाठीही बाहेर पडावं लागू नये म्हणून त्यांना घरपोच अन्न धान्य, अत्यावश्यक सेवा अनेक ठिकाणी पोहचवल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात, आपल्या जीवाची पर्वा न करता आजही डिलीव्हरी बॉय लोकांच्या घरी जाऊन सामान पोहचवत आहेत. मात्र सामान पोहचवायला आलेला मुलगा मुसलमान आहे हे कळताच रहिवाश्यांनी सामान घेण्यास नकार दिला. आज कोरोनाच्या या वातारवणातही लोकं धार्मिक भेदभाव करत आहेत.

३२ वर्षाचा बरकत पटेल सामानाची डिलीव्हरी घेऊन मुंबईच्या मीरा रोडयेथील गजानन चर्तुर्वेदी यांच्या घरी पोहचला. सामान घेण्यासाठी चर्तुर्वेदी कुटुंब खाली आले. सामानाची तपासणी करत असताना चर्तुर्वेदी यांनी डिलीव्हरी बॉयला त्याचे नाव विचारले. बरकतने आपले नाव सांगताच चर्तुर्वेदी कुटुंबाचा पार चढला आणि त्यांनी सामान घेण्यास नकार दिला. यावेळी बरकतने तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घातले होते. तरी त्यांनी सामान घेण्यास नकार दिला.

- Advertisement -

चर्तुर्वेदी कुटुंबाने बरकतला त्याच्या धर्मावरून बोलायला सुरूवात केली. शिवीगाळही केली. यावरून बरकत आणि चर्तुर्वेदी कुटुंबाता बाचाबाची झाली. बरकतने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

त्या नंतर बरकतने हा प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यानंतर घरच्यांनी त्याला पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. अखेर पोलिसांनी मीरा रोड येथे राहणाऱ्या चर्तुर्वेदी यांना अटक केली. त्यांना ठाणे सत्र न्यायालयात हजर केलं असता. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनवली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोनामुळे मुलाने जन्मदात्या वडिलांचेच अंत्यसंस्कार नाकारले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -