घरमुंबईमुंबई आणि उपनगरात मध्यम, तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई आणि उपनगरात मध्यम, तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता

Subscribe

मुंबई आणि उपनगरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. उद्याही मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र मुंबईत समुद्र खवळलेला राहणार असून समुद्रकिनाऱ्याजवळ वावरताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच कोकणात ४ ते ६ जुलैदरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून मुंबई व उपनगराला पावसाने झोडपल्याने मुंबईची गती मंगळवारी मंदावली होती. मात्र कालपासून मुंबई पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. काल दिवसभर मुंबई व परिसरात पावसाची रिपरिप सुरूच होती. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार ३ जुलैला सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत ५१.८ मि.मी पावसाची नोंद झाली, तर सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या १२ तासांत कुलाबा वेधशाळेतील पर्जन्यमापकावर १०. मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेच्या पर्जन्यमापकावर काल सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या १२ तासांत केवळ ४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली.

- Advertisement -

दरम्यान पुणे हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार ४ ते ६ जुलैदरम्यान कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ जुलै रोजी दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान केंद्राने दिला आहे. तसेच ४ जुलै ते ७ जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -