घरमुंबईतुमच्या घराचे सर्वेक्षण झाले ?

तुमच्या घराचे सर्वेक्षण झाले ?

Subscribe

मुंबईतील २४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पुर्ण

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला मुंबईत नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे राबवल्या जात असलेल्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील आकडेवारीवरून हे दिसून येत आहे. या पहिल्या टप्प्यात मुंबईतील सुमारे ३५ लाख घरांपैकी १९.८३ टक्के अर्थात ७ लाखांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, लोकसंख्येचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येपैकी १७.२३ टक्के लोकसंख्या म्हणजेच २४ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याचे दिसून येत आहे.

‘कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्याचे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रभावीपणे राबविली जात आहे. तर मुंबईत लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

३५ लाख ४१ हजार ७७५ घरे असून यामध्ये १ कोटी ४२ लाख १७ हजार १५८ मुंबईकर वास्तव्यास आहेत. या सर्व व घरांचे आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सर्वेक्षण दोन वेळा करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अनेक चमू तयार करण्यात आल्या असून प्रत्येक चमूत ३ स्वयंसेवक कार्यरत आहेत. तर स्वयंसेवकांची प्रत्येक चमू ही दररोज साधारणपणे ५० कुटुंबीयांचे सर्वेक्षण करीत आहे. यानुसार मोहिमे अंतर्गत आतापर्यंत मुंबईतील ७ लाख २ हजार ४४७ घरांमधील अर्थात १९.८३ टक्के घरांमधील २४ लाख ४९ हजार १२८ सदस्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांची चमू प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहे. यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व ऑक्सिजन पातळी देखील नोंदवून घेण्यात येत आहे. त्याचबरोबर कोविड या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोणकोणत्या उपाययोजना आपापल्या स्तरावर अंमलात आणाव्यात, याचीही माहिती घरोघर जाऊन देण्यात येत आहे. तसेच ही माहिती सहजसोप्या भाषेत देणारे एक पत्रक देखील प्रत्येक घरी देण्यात येत आहे.

- Advertisement -

 

कोणत्या वॉर्डमध्ये किती सर्वेक्षण 

 

‘बी’ विभाग : ३७.१२ टक्के घरांचे सर्वेक्षण

‘एल’ विभाग : ३३.६९ टक्के घरांचे सर्वेक्षण

‘सी’ विभाग : २८.६९ टक्के घरांचे सर्वेक्षण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -