घरमुंबईहार्बरसह मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

हार्बरसह मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

हार्बर मार्गावरील खडी वाहून गेल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे.

ऐन गर्दीच्या वेळी हार्बरसह मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वेच्या मार्गावरील खडी वाहून गेल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशीराने सुरुआहे. तसेच मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचा देखील खोळंबा झाला असून २० मिनिटे मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने सुरु आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यमुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सकाळपासूनच महाराष्ट्रासह मुंबईत पावसाने हजेरी लावली असून याचा फटका लोकल सेवेला बसला आहे. पावसामुळे वाहून गेलेल्या खडीमुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -