घरमुंबईराहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांना शिक्षा

राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांना शिक्षा

Subscribe

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांच्यासह अन्य १७ जणांना सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षावेळी पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांच्यासह अन्य १७ जणांना सत्र न्यायालयाने काल, मंगळवारी एक वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली. मात्र, या सर्वांना मुंबई हायकोर्टात दाद मागता यावी, यासाठी कोर्टाने तुर्तास जामीन मंजूर केला आहे. तुर्भे येथे पैसेवाटप होत असल्याच्या आरोपावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात कामिनी यांच्यासह अन्य १७ जणांविरुद्ध खटला दाखल केला होता. त्यात मुंबई सत्र न्यायालयाने काल निर्णय सुनावला.

पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात 

शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार यंदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा २०१४ ला निवडणूक आल्यानंतर सेना – भाजपच्या युतीने राहुल शेवाळे यांना लोकसभा २०१९ मध्येही दक्षिण मध्य मतदार संघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात आघाडीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे २०१४ मधीलच टक्कर पुन्हा पाहायला मिळतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -