घरमुंबईपावसामुळे आज डबेवाल्यांचीही सुट्टी!

पावसामुळे आज डबेवाल्यांचीही सुट्टी!

Subscribe

मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर डबेवाला संघटनेने देखील सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे परिस्थिती धोकादायक ठरू लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईत एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असतानाच आता डबेवाला संघटनेने देखील मुसळधार पावसामुळे आज सेवा बंद ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असताना मुंबईकर मात्र ठिकठिकाणी अडकून पडले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला संघटनेने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. लाईफलाईन असलेल्या लोकलच्या तिनही मार्गांवरची सेवा देखील कोलमडली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे सायकल चालवणं अशक्य झालेलं आहे. त्यामुळेच आज मुंबईकर नोकरदार वर्गाला डबे पोहोचवता येणार नसल्यामुळे डबेवाला संघटनेकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

उल्हास मुके, अध्यक्ष, मुंबई डबेवाला संघटना


हेही वाचा – मालाडमध्ये भिंत कोसळून १३ जण ठार

सरकारकडून १ दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

दरम्यान, मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गरज असेल, तरच घराबाहेर पडावे असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच, शाळांना देखील एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळीच झालेल्या या गोंधळामुळे मुंबईकर मात्र सलग दुसऱ्या दिवशी कामावर जाताना हैराण झाल्याचं चित्र मुंबईतल्या विविध रेल्वे स्थानकांवर दिसत आहे.

- Advertisement -

सायन स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर तुंबलं पाणी..रेल्वे बंद, प्रवाशांवर ट्रॅकवरून चालत येण्याची वेळ! #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜುಲೈ 1, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -